भारत जगासाठी वरदान नेत्यान्याहू यांचे प्रतिपादन   

नवी दिल्ली : भारत हा जगासाठी वरदान आहे. तर इराण शाप आहे, असे प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केले. यावेळी त्यांनी दोन्ही देशांचे नकाशेही दाखवले.नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७९ व्या सत्राला संबोधित केले.  त्यावेळी त्यांनी मध्य-पूर्वेत चालू असलेल्या संघर्षासाठी इराणला जबाबदार ठरवले. तसेच यावेळी त्यांनी दोन नकाशे दाखवले. दोन्ही नकाशांमध्ये वेगवेगळ्या देशांचे समूह रेखाटण्यात आले होते. यापैकी पहिल्या नकाशात इराणसह इतर काही देश दिसत होते. या देशांना त्यांनी अभिशाप म्हटले आहे. तर दुसर्‍या नकाशात भारतासह इतर काही देश दाखवण्यात आले आहेत. या देशांना नेतान्याहू यांनी वरदान म्हटले आहे.  
 
नकाशात इस्रायल आणि त्याचे अरब भागीदार देश भारतापर्यंतच्या प्रदेशाला हिंदी महासागर व भूमध्य सागरमार्गे आशिया व युरोपशी जोडलेले दाखवले होते. शाप असे लिहिलेल्या नकाशावर इराणने हिंदी सागरापासून भूमध्य सागरापर्यंतच्या प्रदेशात निर्माण केलेली दहशतवादी कमान दाखविण्यात आली होती.

Related Articles