E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
उद्योगस्नेही धोरणामुळे राज्य परकीय गुंतवणूकीमध्ये अव्वल : उद्योगमंत्री उदय सामंत
Samruddhi Dhayagude
30 Sep 2024
पुणे : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली असून उद्योगस्नेही धोरणामुळे राज्य परकीय गुंतवणूकीत प्रथम क्रमांकावर आहे असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.’महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या उद्योग विभागाच्यावतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवाजी पाटील, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मुख्य अभियंता नितीन वानखेडे यावेळी उपस्थित होते.सामंत म्हणाले, महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम उद्योग विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांची पारदर्शकता दाखविणारा आहे. उद्योगांसाठी शासन सकारात्मक आहे. महाराष्ट्रात सात ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान आणि मोठया उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. उद्योग क्षेत्रात पुरुषांसोबतच महिलाही पुढाकार घेत आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे एकही उद्योग राज्याबाहेर गेला नाही.
उद्योग विभागावर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते हे टिका करणार्यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितले केले.औद्योगिक क्षेत्रात जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुतवणूक आली असून परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चून राज्यातील २८९ औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बीडकीन औद्योगिक क्षेत्रात ५२ हजार कोटी रुपयांची, एक लाख कोटी रुपयांची विदर्भात तसेच कोकण औद्योगिक क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेद्वारे महिलांना शासनातर्फे आर्थिक मदत करण्यात येते. ही रक्कम बाजारात येण्यामुळे त्याचा उद्योग क्षेत्राला फायदा होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत १० नवीन उद्योजकांना उद्योगमंतत्र्यांच्याहस्ते पाच कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले.
बारणे म्हणाले, उद्योजकांचा उद्योग विभागातर्फे सत्कार करणे चांगली संकल्पना आहे. पुणे व परिसरातील उद्योजक व कामगारांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले असून, रिंग रोड व मेट्रोच्या जाळयामुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योगस्नेही धोरणामुळे उद्योगांची भरभराट झाली आहे. विभागीय आयुक्त या नात्याने विभागातील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल व प्रशासनाकडून उद्योजकांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल असे सांगितले. उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले.
Related
Articles
व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल
07 Oct 2024
उजनी धरणातून सहा कोटी रुपयांची वीज निर्मिती
07 Oct 2024
सेन्सेक्स १,७८९ अंकांनी घसरला
04 Oct 2024
मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिमंडळ बैठक रद्द
09 Oct 2024
अनमोल 'रतन' टाटांच्या अनमोल आठवणी
10 Oct 2024
पत गमावलेला महापौर!
06 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
विकृतीला चाप
5
कामाचा जीवघेणा ‘ताण’
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)