किव्ह : युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी राजीनामा दिला आहे. या संदर्भातील माहिती युक्रेनच्या संसदीय अधिकार्यांनी बुधवारी दिली. गेल्या आठवड्यात अध्यक्ष झेलन्स्की यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीत कुलेबा यांनी पदत्याग करणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबतची अधिकृत घोषणा सभापती रुस्लान स्टिफनचंक यांनी काल केली. रशियाने लव्हिह शहरांवर नुकताच हवाई हल्ला केला होता. त्यात सातजणांचा बळी गेला तर, ३५ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले होते. त्याम वैद्यकीय कर्मचारी आणि एका मुलाचा समावेश हेता. त्यामुळे कुलेबा यांनी पदत्याग केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मंगळवारी युक्रेनच्या शैक्षणिक संकुलावर दोन क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला होता. त्यात ५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू तर २०० जखमी झाले होते. त्यापूर्वी झालेल्या हल्ल्यामुळे कुलेबा यांना दु:ख झाले आणि त्यातून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Fans
Followers