इंग्लिश खाडीत नाव बुडून १२ स्थलांतरीतांचा मृत्यू   

पॅरिस : इंग्लिश खाडीत स्थलांतरीतांची नाव बुडाल्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्स येथून ब्रिटनकडे नागरिक एका छोट्या नावेतून प्रवास करत होते. इंग्लिश खाडी ओलांडण्यापूर्वीच नाव बुडाली होती. यानंतर फ्रान्सच्या तटरक्षक दलाने १२ पेक्षा अधिक जणांची सुटका केली. उत्तर फ्रन्सच्या किनार्‍याजवळच्या विमेरेक्स परिसरात नाव मंगळवारी बुडाली होती. नावेत स्थलांतरीत दाटीवाटीने तर अनेक जण पाण्यात पाय सोडून प्रवास करत होती. त्यामुळे ती वजनामुळे बुडाल्याचा अंदाज आहे. यानंतर फ्रान्सच्या तटरक्षक दलानेत परिसरात मदतकार्य राबविले. सुमारे १२ जणांना वाचविले असून तेवढेच प्रवासी समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू पावले.
 
स्थलांतर करणारे नागरिक ब्रिटनकडे जाण्यासाठी इंग्लिश खाडीचा वापर करतात. तो एकमेव नावेतून जाण्याचा जवळचा मार्ग आहे. मात्र,  तेथे वारंवार दुर्घटना घडून यापूर्वीही अनेक स्थलांतरीत बुडाले आहेत. 

Related Articles