नरभक्षक लांडग्यांना ठार करण्यासाठी बंदुकधार्‍यांचे पथक   

लखनौ: उत्तर प्रदेशातील बहरीच जिल्ह्यातील नरभक्षी लांडग्याना ठार करण्यासाठी ९ बंदुकधार्‍यांचे पथक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार तयार केल आहे. उत्तर प्रदेशातील बहरीच परिसरात लांडग्यांचा उपद्रव वाढला आहे.  जंगलात लांडगे गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत शिरून लहान मुलांवर हल्ला करत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरभक्षी लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने आता पावले उचलली आहे. त्या अंतर्गत ९ बंदुकधार्‍याचे पथक तयार करण्याचे आदेश दिले आहेत त्यापैकी ६ जण वन विभागाचे आणि तीन पोलिस खात्यातील असतील, अशी माहिती वन अधिकारी अजित प्रताप सिंह यांनी दिली. त्या शिवाय तीन विशेष पथके तयार केली आहेत.  ही पथके तीन विभागांत काम करणार आहेत. त्यापैकी एक राखीव ठेवले आहे. प्रत्येक पथकात तीन बंदुकधारी असतील. 

Related Articles