आयआयटी विद्यार्थिनीचा इमातीवरून पडून मृत्यू   

भुवनेश्वरमधील घटना

भुवनेश्वर : ओडिशातील आयआयटी भुवनेश्वरमध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री तिचा मृतदेह प्रशासकीय इमारतीच्या आवारात पोलिसांना मिळून आला.कृत्रिका राज (वय २३), असे तिचे नाव आहे ती मूळची दिल्लीची रहिवासी असून बी. टेकच्या तिसर्‍या वर्षात शिकत होती.. तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केला. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ती पाचव्या मजल्यावरून पडली होती. सुरक्षारक्षकांनी ती पडल्यानंतरचा आवाज ऐकला होता. तातडीने तिला संस्थेच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृतदेह पुढील तपासणीसाठी कुदा जिल्हयातील रुग्णालयात नेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनी दहा दिवसांपूर्वी दिल्लीत आपल्या घरी गेली होती. त्यानंतर परतल्यानंतर ती ती पूर्वीपेक्षा अधिक शांत दिसत होती, असे सूत्रांनी सांगितले. 

Related Articles