कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन सुरूच   

कोलकाता : महिला डॉक्टरला न्याय द्यावा, या मागणीसाठी पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात सुरू असलेले कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन बुधवारी तिसर्‍या दिवशी सुरूच होते.आर. जी. कार महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि त्यानंतर तिचा खून ९ ऑगस्ट रोजी झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पीडितेला न्याय द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. त्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णालयातील आरोग्यसेवा बंदच होती. पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, प्रकरणाचा कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडून तपास सुरू आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. त्यामुळे आयुक्त गोयल यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. 
 

Related Articles