फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट   

 

नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी बुधवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने अधिकृत सोशल मडिया हँडलवर यासंदर्भात पोस्ट करुन माहिती दिली आहे. या भेटीचे छायाचित्रदेखील काँग्रेसने शेअर केले आहे.हरयाना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. पुनिया आणि फोगट विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
हरयाना विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांत उमेदवार यादी जाहीर होणार आहे. पक्षाने ९० पैकी ६६ उमेदवारांची नावांवर अंतिम मोहोर उमटवली आहे. तर, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि हरयानाचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी दोन दिवस थांबा; सर्व चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले आहे.
 
राज्यात विधानसभेच्या ९० जागा आहे. हरयानासह जम्मू-काश्मीरमध्येदेखील निवडणुका होत आहेत. या दोन्ही निवडणुकांचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर जाहीर होईल.

Related Articles