सचिन खिलारीला रौप्यपदक   

भारताला ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये पदक

पॅरिस :  महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉटपुट एफ ४६ प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. हे आजचे पहिले पदक आहे. या रौप्य पदकासह सचिन ४० वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे. सचिनने १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविचला मिळाले. सचिनने यापूर्वी वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.
 
३४ वर्षीय खेळाडूने दुसर्‍या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि १६.३० मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे २०२४ मध्ये झालेल्या जागतिक पॅराअ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा विक्रम केला. खिलारीचे रौप्यपदक हे सध्या सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये पॅरा-थलेटिक्समध्ये जिंकलेले २१ वे पदक आहे.
 
गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. एफ ४६ श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे.पॅरालिम्पिकच्या इतिहासात शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८४ मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता हे तिसरे पदक ८ वर्षांनंतर आले आहे.
 

कोण आहे सचिन खिलारी ?

सचिन सर्जेराव खिलारी हा मूळचा आटपाडी सांगली जिल्ह्यातील आहे. सचिनने यापूर्वी 'वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप' २०२४ मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. सचिनने ३४ वर्षीय दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि १६.३० मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे २०२४ मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा विक्रम केला. खिलारीचे रौप्यपदक हे सध्या सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये पॅरा-ॲथलेटिक्समध्ये जिंकलेले ११वे पदक आहे.गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही सचिनने सुवर्णपदक पटकावले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातांची हालचाल कमी आहे. या प्रकारात खेळाडू उभे राहून स्पर्धा करतात.

गोळाफेकमध्ये तिसरे पदक

पॅरालिम्पिकच्या इतिहासात गोळाफेकमध्ये पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८४ मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने २०१६ च्या 'रिओ पॅरालिम्पिक'मध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता हे तिसरे पदक ८ वर्षांनंतर आले आहे.

Related Articles