तर राज्याचा दर्जा पुन्हा देऊ : काँग्रेस   

जम्मू : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन बुधवारी येथे दिले. पुढील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीचे सरकार स्थापन येईल, असेही ते म्हणाले.
 
जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी येत्या १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यांत मतदान होणार असून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. राहुल यांनी काल आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. 
 
पंतप्रधानांनी आत्मविश्वास गमावला आहे. केंद्रातील भाजप सरकार ‘इंडिया’ आघाडी लवकरच हटवेल, असे राहुल यावेळी म्हणाले. तसेच, काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पूर्ण बहाल करेल, असे आश्वासन दिले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झाले आहे. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय हा राज्यातील नागरिकांवरील अन्याय आहे. आता जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा राज्याच दर्जा देणे ही केवळ काँग्रेस पक्ष किंवा नॅशनल कॉन्फरन्स किंवा इंडिया आघाडीची जबाबदारी नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आम्ही ही जबाबदारी पार पाडू, अशी ग्वाही राहुल यांनी अनंतनाग येथे आयोजित सभेत दिली. आम्हाला निवडणुकीपूर्वी राज्याचा दर्जा बहाल करायचा होता; पण भाजपचा याला विरोध होता. त्यांना राज्यातील जनतेच्या हक्कांपेक्षाही आधी निवडणुका हव्या होत्या, असा आरोपही त्यांनी केला.

Related Articles