उत्तर कोरियाच्या ३० अधिकाऱ्यांना फाशी   

किम जोंग उन यांचा कठोर निर्णय
 
जगातील बऱ्याच देशांमध्ये गंभीर गुन्ह्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. ती शिक्षा देताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. साक्षीपुराव्यांची शहानिशा केली जाते. त्यानंतर आरोपीला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. दयेचा अर्ज करुन फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठीचाही पर्याय असतो. पण उत्तर कोरियामध्ये घडलेल्या एका गोष्टीमुळे तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने आपल्या देशाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा जाहीर केली आहे.
 
उत्तर कोरियाला जुलै महिन्यात पुराचा तडाखा बसला. या पुरामुळे चांगांग प्रांतात प्रचंड विध्वंस झाला. या पुरात सुमारे ४ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. लोकांची घरे पुरात उद्ध्वस्त झाली, बऱ्याच नागरिकांना घरे सोडावी लागली आणि इतर भागात स्थलांतरित व्हावे लागले. उत्तर कोरियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ७,१४० एकर जमीनीचे नुकसान झाले. याशिवाय रेल्वे आणि रस्त्यांचेही नुकसान झाले. उत्तर कोरियाच्या नॉर्थ कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) वृत्त दिले की, किंग किम जोंग यांनी जुलैमध्ये देशात आलेला पूर रोखू न शकणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षेचे आदेश दिले आहेत.
 
दक्षिण कोरियाच्या प्रसार माध्यमांनी म्हटले की, उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी पूर रोखण्यासाठी उपाययोजना करुन आवश्यक ती पावले उचलली पाहिजे होती. पण ते तसे करु शकले नाहीत. अशा सर्वांवर कठोर कारवाई करणार आहे. त्यांना कठोर शिक्षा दिली जाणार आहे. अलीकडे उत्तर कोरियामध्ये भयानक पूर आला होता. त्यामध्ये ४ हजार लोकांचा मृत्यू झाला. या मोठ्या संकटानंतर किम जोंग-उन ने पूरपरिस्थितीचे व्यवस्थापन नीट न करता आल्याने ३० अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या सर्वांना तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली नाही, कोणताही दंडदेखील केला गेला नाही, उलट त्या ३० अधिकाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

Related Articles