महापालिकाच सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करणार : महापालिका आयुक्त   

पुणे : महापालिकेकडून बसविण्यात आलेले एक हजार ५४ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. त्यात हे कॅमेरे पोलिसांनी दुरुस्त करायचे की पुणे महापालिकेवरून यावरुन देखील चांगलाच वाद सुरु असल्याचे समोर आले होते.  शहरातील बंद असलेल्या सीसीटिव्ही यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक्ता असल्यास निधीचे वर्गीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.  
 
शहरात होत असलेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांना चांगलेच जेरीस आणले आहे. पावसामुळे पु्णेकरांची काळजी घेणारा पुणे महापालिकेने बसवलेले तिसरा डोळा बंद पडल्याची माहिती समोर आली होती. या माहिती समोर येताच महापालिका प्रशासनावर पुणेकरांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. शहरातील सुमारे एकोणतीशे सीसीटीव्ही कॅमेरे पैकी एक हजार ५४ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. हे कॅमरे पावसामुळे बंद पडले वादळीवार्‍यात अनेक कॅमेर्‍यांच्या केबल तुटल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे कॅमेरे तात्काळ दुरुस्त करणे अपेक्षित असताना देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे आर्थिक तरतदूच नसल्याचे सांगण्यात आले होते. रस्त्यावरील कॅमेरे महापालिकेने नव्हे तर पोलिसांनीच दुरुस्त करावेत असे काही अधिकार्‍यांचे म्हणणे होते. कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर महापालिकेने एकदाही या कॅमेर्‍यांची देखभाल दुरुस्ती केली नसल्याचेही समोर आले आहे. एरवी महापालिका नको त्या गोष्टीवर मोठा खर्च करते. कोणतेही नियोजन नसताना टेंडर  काढते. बाजार दरापेक्षा अधिक पैसे खर्च करुन एखादे काम करते. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. तर पुणेकरांची सुरक्षिता महत्वाची असताना महापालिका आखता हात का घेते असाही प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केला होता.
 
दरम्यान शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. शहरात येणार्‍यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला असता, हे कॅमेरे आता महापालिकाच दुरुस्त करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.महापालिकेने नगरसेवकांच्या निधीतून शहराच्या अनेक भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यानंतर महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकराज सुरु आहे. 
 
त्यामुळे महापालिकेच्या तिसर्‍या डोळ्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचेही बोलले जाऊ लागले आहे. हे  कॅमेरे हे संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकीतील कंट्रोल रुममध्ये जोडले गेले आहे. चार वर्षांपूर्वी हे कॅमेरे बसविण्याचे प्रमाण अधिक होते. त्याचा सुरुवातीच्या कालावधीत पोलिसांना उपयोग झाला. बऱ्याच गुन्ह्यांचा माग काढण्यात कॅमेरे महत्वाचे ठरले, परंतु आता हे सीसीटीव्ही कॅमेरेच बंद अवस्थेत आहे.

शहराच्या मध्यभागातील कॅमेरे बंद...

संभाजी पोलीस चौकी, नारायणपेठ पोलीस चौकी, शनिवार पेठ पोलीस चौकी, खडक पोलीस चौकी, सेनादत्त पोलीस चौकी, मंडई पोलीस चौकी,  मिठगंज पोलीस चौकी, पेरुगेट पोलीस चौकी, कसबा पेठ पोलीस चौकी, ताडीवाला रोड पोलीस चौकी आदी भागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात याच चौकींच्या भागांत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याच चौकींच्या भागातून गणेश विसर्जन मिरवणुक मार्गस्थ होत असते.
 

Related Articles