सफाई कामगाराच्या नोकरीसाठी ४६ हजार पदवीधरांचा अर्ज   

बेरोजगारीच्या झळा! 

महाराष्ट्रासह, देशभरात बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बेरोजगारीच्या झळा बऱ्याच पदवीधरांना बसत आहेत. पदवी मिळाली आहे पण नोकरी नाही अशी स्थिती आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सफाई कामगाराची पदभरती करायची आहेत त्यासाठी ४६ हजार पदवीधरांनी अर्ज केल्याची ही घटना आहे.
 
हरयाणा सरकारच्या विविध खात्यांमध्ये, मंडळांमध्ये, महापालिकांमध्ये सफाई कामगारांची पदे भरायची आहेत. त्यासाठी एक दोन नाही तब्बल ४६ हजार पदवीधरांनी अर्ज केला. ही नोकरी १५ हजार रुपये प्रति महिना पगाराची आहे. ज्या पदवीधरांनी अर्ज केला आहे त्यापैकी ६ हजार जण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर ४० हजार जण पदवीधर आहेत. १ लाखांहून अधिक असे अर्ज आलेत ज्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. नेमक्या किती जागा भरल्या जाणार आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र आपल्याला नोकरी हवी या आशेने पदवीधरांनी सफाई कामगारांच्या जागांसाठी अर्ज केले आहेत.

एवढे अर्ज का आले?

सफाई कामगाराची नोकरी असली तरीही ती सरकारी नोकरी आहे. त्यामुळे त्यात स्थैर्य आहे, नोकरी जाण्याची भीती नाही त्यामुळे अर्जदारांची संख्या एवढी आहे. सध्याच्या घडीला कंत्राटी पद्धतीने काम करण्याची पद्धत रुढ झाली आहे. या परिस्थितीत स्थैर्य असणारी नोकरी मिळू शकेल म्हणून बऱ्याच पदवीधरांनी आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. हरियाणा रोजगार निगम लिमिटेड तर्फे सफाई कर्मचाऱ्यांच्या जागा जाहीर करण्यात आल्या. यासंदर्भात खासगी वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. 

Related Articles