E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यातून बसच्या ५५० फेर्या रद्द
Samruddhi Dhayagude
04 Sep 2024
पुणे : एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे मंगळवारी पुणे शहरासह जिल्ह्यातील आगारात बसच्या ५५० फेर्या रद्द झाल्या. सासवड, भोर, तळेगाव आदी स्थानके पूर्णत: बंद राहिल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. बसअभावी अनेक ठिकाणी प्रवासी हतबल होते. त्याचा खासगी बस चालकांनी गैरफायदा घेतला आणि प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले. प्रवासांना मानसिक मनस्तापासह आर्थिक फटका सहन करावा लागला.
शहर आणि जिल्ह्यात १३ आगार आहेत. या आगारातून दररोज ८०० बस धावतात. काल दिवसभरात केवळ २५० बस धावल्या. तर, ५५० बस कर्मचार्यांअभावी धावू शकल्या नाहीत. सासवड, भोर, तळेगाव आगार दिवसभर शंभर टक्के बंद होते. जिल्ह्यात केवळ ४० टक्के बस धावल्या. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
पुण्यातील स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक आणि शिवाजीनगर (वाकडेवाडी) ही महत्त्वाबी बस स्थानके अंशत: सुरू होती. काही मार्गावरच्या बस धावत होत्या. तर, काही मार्गावर बस धावल्याच नाहीत. त्यामुळे एकतर प्रवास रद्द करावा लागला किंवा खासगी बसचा पर्याय स्वीकारावा लागला. अनेक स्थानकात मोठ्या प्रमाणात बस थांबून होत्या.
शासकीय कर्मचार्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळावे. कामगार कराराच्या तरतुदीनुसार २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी. एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्यावी. एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी, आदी एसटी कर्मचार्यांच्या मागण्या आहेत.
७० टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी
७ ऑगस्टच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत एकमत न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी २० तारखेला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी बैठकच घेतली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचार्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. या बैठकीसाठीच आम्ही आंदोलनाची तारीख ९ ऑगस्टवरून ३ सप्टेंबर केली होती. आमच्या प्रश्नांवर मार्ग निघत नसल्याने आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला. या आंदोलनाला राज्यभरात कर्मचार्यांकडून प्रतिसाद मिळाला. ७० टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय झाली तर त्यास शासन जबाबदार असेल.
- संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती
एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे विविध कामानिमित्त ठिकठिकाणांहून पुण्यात आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. खासगी वाहनांचे भाडे परवडणारे नसल्याने काही प्रवाशांनी स्थानकातच थांबणे पसंत केले. लातूर शहरातून पुण्यात लग्न कार्यासाठी आलेले एक कुटुंब वाकडेवाडी बस स्थानकात अडकले होते. एसटीत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आहे. त्यामुळे आम्ही बसनेच लातूरहून पुण्यात आलो होतो. एसटीनेच लातूर जाणार आहोत. गेल्या चार तासांपासून स्थानकात बसून असल्याचे प्रवासी मीना कांबळे यांनी सांगितले.
Related
Articles
विजांच्या कडकडाटात पुण्यात पाऊस
03 Oct 2024
अकृषिक कर पूर्णपणे माफ
05 Oct 2024
व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल
07 Oct 2024
मालदीवला ५० दशलक्ष डॉलर्सची मदत
08 Oct 2024
रिलायन्स-स्टार इंडियादरम्यान ७१ हजार कोटींचा करार
07 Oct 2024
कुंभमेळ्यादरम्यान मद्य आणि मांस विक्रीवर बंदी : योगी
07 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)