E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मेट्रोच्या रामवाडी मार्गामुळे प्रवासी संख्येत २० टक्के वाढ
Samruddhi Dhayagude
04 Sep 2024
पुणे : पुणे मेट्रोचा रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू झाल्यावर दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये निरंतर वाढ होताना दिसत आहे. जूनमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखापेक्षा जास्त होती, तर ऑगस्ट मध्ये दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये २० टक्के वाढ दिसून आली आहे.
ऑगस्टमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख १८ हजार २४१ इतकी नोंदवण्यात आली आहे. या महिन्यात पुणे मेट्रोला ५ कोटी ६९ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न १८ लाख ६८ हजार इतके आहे. एकूण प्रवासी संख्येची विभागणी केली असता पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गावर २९ टक्के प्रवासी संख्या, तर रामवाडी ते वनाज या मार्गावर ७१ टक्के प्रवासी संख्या निदर्शनास आली आहे. पुणे मेट्रोचे तिकीट घेण्यासाठी ७० टक्के प्रवाशांनी डिजिटल मार्गाचा वापर केला, तर रोख रक्कम घेऊन तिकीट काढण्याची संख्या केवळ ३० टक्के आहे. डिजिटल माध्यमातून तिकीट घेणार्यांमध्ये पुणे मेट्रो भारतात सर्वात अग्रेसर आहे. डिजिटल माध्यमाद्वारे तिकीट घेतल्यामुळे कागदाची बचत होऊन पुणे मेट्रोच्या पर्यावरण पूरक उद्दिष्टांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. डिजिटल माध्यमांची विभागणी केल्यास असे निदर्शनात आले की, डिजिटल किऑस्कद्वारे २० टक्के, तिकीट वेंडिंग मशीनद्वारे ६ टक्के , व्हॉट्स अपच्या माध्यमातून १८.८ टक्के , मोबाईल पच्या द्वारे ९.१७ टक्के आणि महा मेट्रो कार्डद्वारे १३ टक्के लोकांनी मेट्रोचे तिकीट प्राप्त केले आहे.
Related
Articles
केजरीवाल तुरुंगाबाहेर
14 Sep 2024
पर्यटकांसाठी ’काझीरंगा‘ १ ऑटोबरपासून खुले
09 Sep 2024
जमिनीवरून आकाशात मारा करणार्या क्षेपणास्त्रांची चाचणी
14 Sep 2024
संशयित मंकी पॉक्स रुग्णांची तपासणी करा
11 Sep 2024
सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांनाही आयुष्यमान आरोग्य विमा
12 Sep 2024
ब्रिटनच्या सहा अधिकार्यांची हकालपट्टी
14 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
हवामानातील बदल, बदलते मनही !