लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आज वितरण   

पुणे : लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (गुरुवारी) ज्येष्ठ समाज सेविका, प्रख्यात लेखिका व राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते देऊन गौरविले जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला उपस्थित असणार आहेत. हा सोहळा दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम टिळक प्रेमींना https://youtube.com/@tmvmasscommunication यावर पाहता येईल.

Related Articles