E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
शैक्षणिक
दहावी, बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
Wrutuja pandharpure
05 Nov 2026
अतिविलंब शुल्कासह 5 ते 18 नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येणार
पुणे
: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांसाठी अर्ज क्रमांक 17 द्वारे खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होणार्यांना अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना 5 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.नियमित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना दहावी व बारावीची परीक्षा देण्याची संधी मिळावी, यासाठी मंडळाकडून अर्ज क्रमांक 17 द्वारे खासगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्क भरून अर्ज करावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत, आधारकार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट आकारातील छायाचित्र अपलोड करणे आवश्यक आहे. नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज परीक्षा शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च 2027 च्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी अर्ज करण्याची ही अंतिम संधी असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
Related
Articles
ऊस दर जाहीर करण्यासाठी कारखानदारांना प्रशासनाचा तीन दिवसांचा अल्टिमेटम
04 Nov 2026
पिंपरीत पूजा साहित्याच्या दुकानांना मध्यरात्री आग
04 Nov 2026
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
05 Nov 2026
श्रीलंकेच्या नौदलाकडून सात भारतीय मच्छीमारांना अटक
02 Nov 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्वयंसेवकांचा ई-कचरा संकलन मोहिमेत सहभाग
03 Nov 2026
रविंद्रनाथ टागोर यांच्या शिल्पावर शाई फेकली
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
वाचक लिहितात
4
नियम आणले का? (अग्रलेख)
5
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
6
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन