E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
बेकायदा वाहतुकीला आळा बसताच ‘लालपरी’ हाऊसफुल्ल!
Samruddhi Dhayagude
05 Nov 2026
मंचर-भीमाशंकर मार्गावरील कारवाईचा परिणाम
भीमाशंकर, (वार्ताहर) : पोखरी घाटात घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत मंचर, भीमाशंकर, घोडेगाव आणि जुन्नर या भागातील अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई करून ती पूर्णपणे ठप्प केली आहे. मागील आठ दिवसांपासून अवैध वाहतूक पूर्णत: बंद झाल्याने प्रवाशांचा मार्ग सुकर झाला असून, दुसरीकडे याचा थेट मोठा फायदा एसटी महामंडळाला झाला आहे. एरवी या मार्गावरून प्रवासी नसल्याने मोकळ्या धावणार्या एसटी बस आता ’हाऊसफुल्ल’ धावत असून महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात पोखरी घाटातील अवघड वळणावर प्रवासी वाहून नेणारी एक खासगी गाडी दरीत कोसळून दोघांना प्राण गमवावे लागले होते, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या पोलिस प्रशासनाने मंचर-भीमाशंकर, घोडेगाव-मंचर, घोडेगाव-भीमाशंकर, घोडेगाव-डिंभे आणि घोडेगाव-जुन्नर या मुख्य रस्त्यांवरील अवैध वाहतुकीच्या मुसक्या आवळल्या. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे गेल्या आठ दिवसांपासून अनधिकृत प्रवासी गाड्या पूर्णपणे गायब झाल्या आहेत. अवैध वाहतुकीवर चाप बसल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित आणि सुखरूप प्रवासाला पसंती दिली आहे.
एरवी रिकाम्या धावणार्या लालपरीमध्ये आता प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या प्रशासनानेही तातडीने पावले उचलत या ग्रामीण व आदिवासी भागात एसटी बसच्या अतिरिक्त फेर्या आणि संख्या वाढवली आहे. खासगी अवैध वाहनांमधील धोकादायक आणि जीवघेणा प्रवास थांबल्याने नागरिक आणि महिला प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर दुसरीकडे, प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याने शासनाच्या आणि महामंडळाच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होत आहे. ही कडक कारवाई अशीच सातत्याने सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान या मार्गावरून अवैध प्रवासी वाहतूक सुरू झाली की, एसटी महामंडळाच्या बसची संख्या कमी केली जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पोखरी घाटातील दुर्घटनेनंतर पोलिस आणि परिवहन विभागाने अवैध वाहतुकीविरुद्ध घेतलेली ताठर भूमिका कौतुकास्पद आहे. मात्र, ही कारवाई केवळ अपघातापुरती मर्यादित न राहता कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे, तरच प्रवाशांचा जीव सुरक्षित राहील आणि एसटी महामंडळाचा महसूल वाढेल. असे प्रवासी विठ्ठल मुकणे, गंगुबाई मुकणे यांनी सांगितले.
Related
Articles
आंध्र प्रदेशाला ‘मुरासू’ चक्रीवादळाचा तडाखा
04 Nov 2026
असमर्थनीय मानसिकता (अग्रलेख)
04 Nov 2026
मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा राजकरणासाठी गैरवापर
08 Nov 2026
अतिवृष्टी व पूरबाधित शेतकर्यांना २९१ कोटींची मदत
03 Nov 2026
तरुण तेजपाल यांना धक्का
07 Nov 2026
दुष्काळात हार्वेस्टरचा फटका; पशुधनाच्या चार्याचा प्रश्न
02 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
वाचक लिहितात
4
नियम आणले का? (अग्रलेख)
5
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
6
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन