E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
प्रसिद्ध कृष्णा कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त
Wrutuja pandharpure
05 Nov 2026
नवी दिल्ली
: भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला 19 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणार्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 ते 23 नोव्हेंबरदरम्यान वेलिंग्टन येथे, तर दुसरा सामना 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान क्राइस्ट चर्च येथे खेळवण्यात येणार आहे. प्रसिद्धच्या फिटनेसबाबत मिळालेल्या या सकारात्मक अपडेटमुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.
डाव्या मांडीच्या मागील स्नायूला (हॅमस्ट्रिंग) दुखापत झाल्यामुळे प्रसिद्ध कृष्णाला मैदानाबाहेर राहावे लागले होते. या दुखापतीमुळे त्याला बुधवारपासून ऑकलंड येथे सुरू होणार्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेलाही मुकावे लागले होते. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध कृष्णाला आता पूर्णपणे फिट घोषित करण्यात आले असून न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध असेल.
न्यूझीलंड ’अ‘ विरुद्ध खेळण्याची शक्यता
दरम्यान, हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज 7 ते 10 नोव्हेंबरदरम्यान लिंकन येथे भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात होणार्या तिसर्या अनौपचारिक चार दिवसीय कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यातून त्याला कसोटी मालिकेपूर्वी सरावाची संधी मिळू शकते. प्रसिद्धला सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले होते. दुखापतीमुळे त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली.
Related
Articles
विद्युत बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय
02 Nov 2026
शहरातील अनेक भागांत पावसाच्या सरी
02 Nov 2026
एमबीबीएस, बीडीएसच्या 138 रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी
05 Nov 2026
वाहनावरील दंडाच्या थकबाकी वसुलीसाठी सरकारची अभय योजना
05 Nov 2026
डीसीसी बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांना उशिरा शहाणपण सुचले
06 Nov 2026
दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दहा लाखांची मदत
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
वाचक लिहितात
4
नियम आणले का? (अग्रलेख)
5
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
6
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन