कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण   

सोलापूर, (प्रतिनिधी) : कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिकी शुध्द एकादशी या दिवशी भरते. यावर्षी कार्तिकी यात्रा २१ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
 
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, शिवाजीराव मोरे तसेच नगराध्यक्ष तथा पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके व कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव उपस्थित होते.

Related Articles