E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
भारत-पोलंडचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
Wrutuja pandharpure
05 Nov 2026
वृत्तवेध
भारत आणि पोलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 12.6 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्या दोन्ही देशांदरम्यान सुमारे 6.3 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी चार करारांवर स्वाक्षर्या केल्या. प्रस्तावित भारत-युरोपीय महासंघ (ईयू) मुक्त व्यापार कराराचा (एफटीए) लाभ घेऊन व्यापार वाढवण्याचाही या धोरणात समावेश आहे.
संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी संरक्षण उद्योग संवाद सुरू करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. यामुळे भारत आणि पोलंडला संरक्षण उपकरणांचा संयुक्त विकास आणि उत्पादन करता येणार आहे. पोलंडची युक्रेनसोबत 530 किलोमीटर लांबीची सीमा आहे. पोलंड आपल्या संरक्षण क्षमतांना बळकटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. युरोपीय महासंघाच्या ‘सिक्युरिटी अॅक्शन फॉर युरोप’ (सेफ) योजनेअंतर्गत पोलंडला 43.7 अब्ज युरो म्हणजेच सुमारे 51.3 अब्ज डॉलर मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत कोणत्याही देशाला मिळणारी ही सर्वाधिक रक्कम आहे.
या निधीपैकी 35 टक्के रक्कम पोलंडला परदेशातील संरक्षण उत्पादनाशी संबंधित गुंतवणुकीसाठी खर्च करता येणार आहे. त्यामध्ये भारतातील गुंतवणुकीच्या संधींचाही समावेश आहे. गोपनीय माहितीची सुरक्षा आणि देवाणघेवाण यासंबंधीच्या करारावरही भारत आणि पोलंडमध्ये काम सुरू आहे. या करारावर लवकरच स्वाक्षर्या होण्याची अपेक्षा आहे.दोन्ही देशांमधील खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी एका व्यावसायिक मंचावर सुमारे सहा करारांवर स्वाक्षर्या केल्या. हे करार अंतराळ, रेल्वे, खाणकाम आणि कोळसा वायूकरण यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.
Related
Articles
चीनच्या देणग्यांवर काँग्रेसचे आंदोलन
02 Nov 2026
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची निवृत्ती
04 Nov 2026
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान
04 Nov 2026
भारतासाठी थोडी आशा (अग्रलेख)
06 Nov 2026
आंध्र प्रदेशाला ‘मुरासू’ चक्रीवादळाचा तडाखा
04 Nov 2026
दुष्काळग्रस्तांच्या चेहर्यावर दिवाळीचा आनंद
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
वाचक लिहितात
4
नियम आणले का? (अग्रलेख)
5
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
6
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन