E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
05 Nov 2026
दिवाळीत दुष्काळग्रस्तांची आठवण ठेवा
दीपावली हा प्रकाश, उत्साह आणि आनंद यांचा सण; पण या सणांना थोडी तारतम्याची जोड दिली, तर सण आपल्या बरोबरच इतरांनाही आनंद देऊ शकतात. आज महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. राज्याच्या 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. पुढे या आकडेवारीत भर पडू शकते. गाव-खेड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गाव खेडी येथे पिण्यासाठीचे पाणी, शेतीसाठीचे पाणी यांचा प्रश्न भविष्यात दिवसेंदिवस जटील होत जाणार आहे. गावांतील लोक यामुळे शेती वाडी, गुरे-ढोरे गहाण ठेवून तसेच वेळप्रसंगी विकून शहरांकडे स्थलांतर - धाव घेणार आहेत. यामुळे शहरातील परिस्थितीही चिघळत जाणार असून ती हाताळताना प्रशासनाच्या नाकी नऊ येणार आहे. या सर्व परिस्थितीला आणि या अनुषंगाने ओढवणार्या परिणामांना तोंड देण्याची तयारी जनतेने ठेवणे गरजेचे आहे. दसरा, दिवाळी यावर्षी साधेपणाने साजरी करून फटाके, गोडधोड खाद्यपदार्थ - फराळ, नवीन कपडेलत्ते यांवरील होणार्या संभाव्य खर्चात नागरिकांनी किमान 20-30 टक्के कपात करून तो पैसा मुख्यमंत्री दुष्काळ निधीला द्यावा. जेणेकरून सरकारला या जनतेच्या ’खारीच्या वाट्यातून’ काही उपाय योजना ’दुष्काळ निवारण’ कामांसाठी करता येतील.
बाळकृष्ण शिंदे, पुणे
हक्काच्या पाण्यावर गदा
पुणे शहराला कायमस्वरूपी गरजेनुसार पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने खडकवासला धरण साखळीमध्ये चार धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरण क्षेत्रांची पाणी साठवणूक क्षमता जवळपास 29.13 टीएमसी एवढी असून यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पाणीसाठा थोडा कमी झाला आहे. पाणी शिल्लक असताना देखील पाटबंधारे विभागाने पुणे शहरासाठी फक्त सात टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. खडकवासला धरण साखळीमधील ही चारही धरणे पुणे शहरासाठी निर्माण केली असून त्यावर फक्त पुणेकरांचा हक्क असला पाहिजे, असे असताना देखील पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणली गेली आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे दहा टक्के पाणी कपात करणे योग्य होते; परंतु धरण साखळीमध्ये पुरेसे पाणी असताना देखील कमी पाणी कोटा मंजूर करणे ही पुणेकरांची फसवणूक आहे.
विजय आकुर्डेकर, पुणे
भारतीय खेळाची उपेक्षा
नुकतीच कॉमनवेल्थ कब्बडी स्पर्धा 2026 अहमदाबाद येथे झाली. दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीवर त्याचे प्रक्षेपण बघताना खूप आनंद वाटला. 31 ऑक्टोबरला महिला आणि पुरुषांचे अंतिम सामने झाले. त्यात भारतीय महिला आणि पुरुष संघानी अजिंक्यपद मिळवले आणि खूप मोलाची भेट त्यांनी भारतीय कब्बडीप्रेमी रसिकांना दिली. दुर्दैवाने या वृत्तास आजच्या वर्तमानपत्रात स्थान मिळालेले नाही, ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे. इतर खेळांच्या वृत्तांनी रकाने भरण्यासाठी कब्बडीकडे दुर्लक्ष केलेले दिसते ही आहे आजची पत्रकारिता.
विजय देवधर, पुणे
मोबाईलचे व्यसन
सध्या मोबाईल नावाच्या भस्मासुराने तरुण पिढीलाच नव्हे, तर त्यांच्या पालकांना देखील अक्षरशः ग्रासून टाकले आहे. यामुळे घरातील तसेच नात्यांमधील लोकांमधील संवादच हरवून गेला आहे व नात्यांमध्ये दरी पडू लागली आहे. मुले तर त्यात बराच वेळ डोके घालून बसल्यामुळे त्यांचे अभ्यासावर तसेच खाण्यापिण्यावर लक्षच नसते. किंबहुना आजच्या छोट्या-छोट्या दोन तीन वर्षांच्या मुलांचे जेवण मोबाईल बघितल्याशिवाय पूर्णच होत नाही. जे चुकीचे आहे.
गुरुनाथ मराठे, बोरिवली. (पूर्व), मुंबई
भेसळयुक्त फराळ नकोच
दिवाळीच्या काळात विकत घेतला जाणारा दिवाळी फराळ मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त असतो. शासनाचे अन्न-भेसळ प्रशासन मोठ्या प्रमाणात तपासणी करत आहे; मात्र व्यापारी वर्ग त्यांची नजर चुकवून आपल्या सवयीनुसार भेसळ करणे चालू ठेवले आहे. दिवाळीचा भेसळयुक्त फराळ हा नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास अत्यंत घातक मारक असतो. व्यापारी दिवाळीचा चिवडा, लाडू, चकल्या, मिठाई, नमकीन दिवाळी फराळ व इतर पदार्थांत भेसळ करून लोकांच्या जीविताशी खेळी करून लाखो-करोडो रुपये या दिवाळी काळात मिठाईच्या माध्यमातून कमवित आलेले आहेत. ग्राहकांनी पॅकेटयुक्त दिवाळी फराळ खरेदी करताना त्या पॅकेटवर त्या फराळाची निर्मिती तारीख व मुदत संपणारी तारीख हे पाहूनच खरेदी करावे. फराळ किंवा इतर कोणतेही दिवाळीसाठी तयार केलेले फराळ जर व्यापारी सुटे विकत असतील, तर ते खरेदी करू नका.
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
Related
Articles
जिल्ह्यातील १७० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
04 Nov 2026
चारधाम यात्रेची हेलिकॉप्टरसेवा बंद करण्याचा कंपन्यांचा निर्णय
03 Nov 2026
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान
04 Nov 2026
सेफर्ट, फिलिप्स आणि मिल्नेची दमदार कामगिरी
02 Nov 2026
एमबीबीएस, बीडीएसच्या 138 रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी
05 Nov 2026
मॉलच्या झगमगाटात गावच्या बाजारपेठा हरवल्या
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
वाचक लिहितात
4
नियम आणले का? (अग्रलेख)
5
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
6
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन