E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
Samruddhi Dhayagude
05 Nov 2026
पिंपरी
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य आणि ‘निर्मल वारी’ अभियानाचे प्रवर्तक संदीप शिवाजी जाधव (वय 53) यांचे बुधवारी पहाटे अंदमान येथे निधन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक संघर्षस्थळाच्या (सेल्युलर जेल) भेटीदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 9:30 वाजता नेहरूनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील संत तुकाराम नगरचे रहिवासी असलेले संदीप जाधव हे व्यावसायिक क्षेत्रातही कार्यरत होते. कल्याण जनता सहकारी बँकेत पुणे विभागीय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले जाधव यांनी शाखा स्तरापासून ते प्रांतापर्यंत अनेक महत्त्वाची दायित्वे यशस्वीपणे पार पाडली. संघातील एक उत्तम घोषवादक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सध्या त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे ’मुख्य मार्ग प्रमुख संयोजक’पद होते.श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीला स्वच्छतेचे अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राबवल्या गेलेल्या ‘निर्मल वारी’ अभियानाचे प्रवर्तक म्हणून त्यांनी ऐतिहासिक योगदान दिले. निर्मल वारीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्था व संघटनांच्या उभारणीत जाधव यांचा मोलाचा वाटा होता. पिंपरी-चिंचवडमध्ये ’ढोल-ताशा महासंघा’च्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
Related
Articles
कास पठार परिसरात जखमी रानगव्याचा वावर
07 Nov 2026
पुणेकरांसाठी छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन
09 Nov 2026
रियाध विमानतळावरील हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू
06 Nov 2026
पोलिओ निर्मूलन पथकावरील हल्ल्यात दोन पोलिस ठार
05 Nov 2026
दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा
10 Nov 2026
भारताची मदार वेगवान गोलंदाजांवर
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
4
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
5
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)
6
शेअर बाजारात किरकोळ वाढ