मेळघाटच्या आदिवासी महिलांनी विणलेली शाल पंतप्रधानांना भेट   

सोलरच्या चरख्यावर तयार केली शाल

अमरावती : दुर्गम व आदिवासीबहुल मेळघाटातील महिला कारागिरांनी सौरऊर्जेवरील चरख्याच्या साहाय्याने पारंपरिक, आधुनिक पर्यावरणपूरकतेला कौशल्याचा साज चढवून तयार केलेली एक विशेष शाल सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आली. दुर्गम व आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती असूनही मेळघाटच्या महिलांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली ही झेप कौतुकास्पद ठरली आहे.

'भारत रिन्युअल एनर्जी समिट २०२६' या परिषदेचा उद्घाटन सोहळा 

दिल्लीतील भारत मंडपम येथे 'भारत रिन्युअल एनर्जी समिट २०२६' या परिषदेचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी स्वागतपर भेट म्हणून मेळघाटातील खादी ग्रामोद्योगाच्या 'कुटीर' ब्रेडतर्फे तयार करण्यात आलेली नैसर्गिक पानांचे ठसे असलेली सौर चरखा शाल मोदी यांना प्रदान करण्यात आली. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते ही शाल भेट देण्यात आली. या परिषदेत १३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ४० हून अधिक मंत्री, धोरणकर्ते, उद्योजक, संशोधक आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.

विकेंद्रित सौर चरखा क्लस्टरद्वारे रोजगार

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला अमरावती विकेंद्रित सौर चरखा क्लस्टर हा ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी कस्तुरबा सोलर खादी महिला समिती या महिलांच्या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक, कार्बन फूट प्रिंट कमी होण्यास मदत

मेळघाटातील महिलांनी विशेष कलाकुसरीतून साकारलेली ही विशेष शाल म्हणजे पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक नवोपक्रम, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक कारागिरांच्या आत्मनिर्भरतेचा एक उत्तम संगम आहे. दुर्गम भागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक आणि हरित ऊर्जेचा वापर करून महिलांनी हे सूत कताईचे काम केले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे केवळ कार्बन फूट प्रिंट कमी होण्यास मदत झाली आहे.
 

Related Articles