E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मनोरंजन
’कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
पुणे
: कॉर्पोरेट क्षेत्रातील अतिशय उज्वल आणि स्थिर कारकीर्द केवळ आपल्या पित्याच्या इच्छेनुसार सोडून देऊन आध्यात्मिक आणि राष्ट्र उभी करणारी पिढी घडविण्यासाठी आपले मृत्युपत्र तयार करून समर्पित कीर्तनकार होण्याचा निर्णय घेणारे डॉ. चेतनानंद महाराज यांची निर्मिती असलेल्या ’कीर्तन’ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. ॥ भक्ती की बाजार । तूच सांग विठ्ठला ॥ ही टॅगलाइन असलेल्या ‘कीर्तन’च्या पोस्टरमध्ये विठू माऊलीचे रूप आणि भक्ताची निस्सीम व निरपेक्ष भावना अत्यंत भावूक व प्रभावी रीतीने दर्शविण्यात आली आहे.
हा चित्रपट केवळ भक्तीचा महिमा सांगणारा नसून, आजच्या काळातील श्रद्धा, अंधश्रद्धा, मानवी मूल्ये, समाजातील व परंपरेतील काळानुरूप बदलणारी स्थित्यंतरे, वारकरी, वारी आणि परमेश्वरावरील अढळ विश्वास यांचा एक प्रगल्भ प्रवास प्रेक्षकांसमोर उभा करणार आहे. वारकरी परंपरा आणि भक्तिभावाचा असीम व भावनाप्रधान अत्युच्च अनुभव देणारा हा चित्रपट 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून संपूर्ण जगभरात एकाच वेळी प्रदर्शित केला जाणार आहे.
यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, डॉ. नारायण महाराज जाधव बाबा, खासदार श्रीरंग बारणे, चित्रपट वितरक अनिल थडानी, राज्य महावितरणचे राजेंद्र पवार, क्रिकेटपटू केदार जाधव, पंढरपूर, देहु, आळंदी, दगडूशेठ गणपती, जंगली महाराज संस्थान यांचे विश्वस्त व पदाधिकारी यांच्यासह राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार संदीप पाठक, प्राजक्ता हनमघर, आर्या घारे, तेजस बर्वे, सुरेश विश्वकर्मा, बालकलाकार गोरज देखणे, गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार विजय गावंडे यांच्यासह दिग्दर्शक अतुल जगदाळे आणि चित्रपटाचे प्रमुख कलाकार उपेंद्र लिमये यांच्या वतीने त्यांच्या पत्नी स्वाती लिमये उपस्थित होते.
Related
Articles
अवजड वाहने लोणंदमार्गे वळवली
05 Nov 2026
छळाला कंटाळून व्यावसायिकाच्या सुनेची आत्महत्या
03 Nov 2026
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
03 Nov 2026
मुसळधार पावसाने बारामतीला झोडपले
03 Nov 2026
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित
04 Nov 2026
कोचीमध्ये सीजेपीचा मोर्चा
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित