E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
अक्षय झांबरे याला चार दिवसांची कोठडी
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
पायल आत्महत्त्या प्रकरण
पुणे
: पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात तिचा पती अक्षय अरविंद झांबरे (वय 38) याला मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर, पायलची सासू, सासरे आणि नणंद फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. माहेरून पैसे, सोने आणि मौल्यवान वस्तू आणण्याचा तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ केल्याने व्यावसायिक अरविंद झांबरे यांची सून पायल हिने गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली. रात्री उशिरा स्वारगेट पोलिसांनी पती अक्षयला अटक केली होती. तसेच, सासू मंगल अरविंद झांबरे (वय 58), सासरे अरविंद झांबरे (वय 65) आणि नणंद अक्षता अरविंद झांबरे-निम्हण (वय 30, सर्व रा. मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
पायल आणि अक्षय यांचा विवाह 2019 मध्ये झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून पायलचा छळ सुरू झाल्याचा आरोप आहे. माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी तिच्याकडे वारंवार तगादा लावला जात होता. त्यावरुन, तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला जात होता. या छळाला कंटाळून पायलने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 13 मार्च 2019 ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अक्षय झांबरे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. हा गुन्हा महिला अत्याचार आणि हुंडाबळीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, एका उच्चशिक्षित महिलेचा जीव गेला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. पायल रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी तिचा शोध घेण्यासाठी काय प्रयत्न केले, तसेच, वेळोवेळी मागणी करण्यात आलेले पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तूंचा आरोपींनी नेमका कसा वापर केला, याचा तपास करायचा आहे.
या वादासंदर्भात शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवायचे आहेत. तसेच, पैसे आणता येत नसतील तर दुसर्या सदनिकेवर जाऊन मुलीसह आत्महत्या कर’, अशा शब्दांत पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून, त्याबाबत सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या गुन्ह्यातील अन्य आरोपींची भूमिका स्पष्ट करण्यासह त्यांचा शोध घेण्यासाठी अटक आरोपीची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. फिर्यादीतर्फे वकील पुष्कर पाटील, वकील ऋतुराज पासलकर आणि वकील आकाश कामठे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत अक्षय झांबरे याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मृत्यूपूर्वी पायलचा संदेश
मृत्यूपूर्वी पायल झांबरे हिने काही नातेवाईकांना मोबाइलवर संदेश पाठविला होता. मला काही झाल्यास सासूच जबाबदार असेल, असा मजकूर त्या संदेशात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या या संदेशाच्या मजकूराची सत्यता याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, घटनास्थळी आत्महत्येची कुठलीही चिठ्ठी आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Related
Articles
दिव्यांगांच्या हक्काची नोकरी नेमकं कोण खातंय?
05 Nov 2026
धनत्रयोदशी : धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य
06 Nov 2026
शेख हसीना यांना सोपवा ; कायदा मंत्र्याची मागणी
09 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याने बाजारपेठ सजली
08 Nov 2026
मँचेस्टर सिटीचा सलग तिसरा पराभव
09 Nov 2026
लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित