E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मेट्रोच्या उभारणीत पुणेकरांचा ‘खारीचा वाटा’!
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
उमेश माळी यांचे सव्वासहा वर्षांचे योगदान
पुणे
: हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर या 23 किलोमीटर लांबीच्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीत पुणे महापालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त उमेश माळी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गेली सव्वासहा वर्षे त्यांनी या प्रकल्पात सल्लागार म्हणून काम पाहिले. विविध शासकीय परवानग्या मिळविणे, प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधणे आणि नागरिकांच्या अडचणी सोडविणे अशा महत्त्वाच्या जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या.महापालिकेतील उपायुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती लक्षात घेऊन तत्कालीन आयुक्तांनी त्यांना मेट्रो प्रकल्पात काम करण्याची संधी दिली. जानेवारी 2020 मध्ये टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीत सल्लागार म्हणून त्यांनी काम सुरू केले.
प्रकल्पाच्या सुरुवातीलाच कोरोना महामारीचे संकट आले. अनेक कामगार गावी परतल्याने मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत शासनाचे निर्बंध पाळून काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी पोलीस, वाहतूक विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणांकडून आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी प्रयत्न केले. प्रकल्पातील अधिकारी, अभियंते आणि कामगारांच्या लसीकरणासाठीही शासकीय यंत्रणांशी समन्वय साधला.मुळशी तालुक्यातील माण येथील मेट्रो कार डेपोसाठी जागा उपलब्ध करून घेणे, थेरगाव येथील यशदा संस्थेच्या जागेवर कास्टिंग यार्ड उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविणे, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्यांसाठी पाठपुरावा करणे, अशी कामे त्यांनी केली.
मेट्रोचे खांब आणि स्थानके उभारताना पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पावसाळी गटारे, दूरध्वनी आणि गॅसवाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसीकडून अग्निशमन ना-हरकत दाखले मिळविण्याच्या प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.मेट्रो प्रकल्पातील बहुतांश अधिकारी आणि कामगार परराज्यांतील असल्याने स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना भाषेची अडचण येत होती. अशावेळी नागरिकांच्या सूचना व तक्रारी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी माळी यांनी समन्वयक म्हणून काम केले. त्यामुळे अनेक संभाव्य अडथळे दूर होण्यास मदत झाली. पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याचे कामही त्यांनी केले.
Related
Articles
पोलंड गोळीबारातील हल्लेखोराचा मृत्यू
09 Nov 2026
अक्कलकोट , तुळजापूर आणि पंढरपूरमध्ये आगीच्या मोठ्या घटना
11 Nov 2026
वर्ल्ड टूर फायनल्समध्ये स्थान मिळवण्याचा लक्ष्य सेनचा प्रयत्न
10 Nov 2026
शेअर बाजारात किरकोळ वाढ
05 Nov 2026
स्वामी विवेकानंद यांचा अवमान करणार्या दोन विद्यार्थिनी निलंबित
07 Nov 2026
जैस्वालचे शतक, सुदर्शनची नाबाद 77 धावांची खेळी
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)