E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
पदोन्नतीतील अनियमिततेची चौकशी पूर्ण होईपर्यंत आर्थिक लाभ रोखा
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
पीएमपीएमएलमधील पदोन्नती प्रक्रियेवर विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप
पुणे
: पुणे महानगर परिवहन महामंडळातील डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या पदोन्नती प्रक्रियेवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. सेवाज्येष्ठता, बिंदू रोस्टर, मागासवर्गीय आरक्षण आणि मंजूर आस्थापना आराखड्यातील तरतुदींचे उल्लंघन करून पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केला आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाल्याचे सांगण्यात येत असताना, शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित पदोन्नतींशी निगडित वाढीव वेतन आणि अन्य आर्थिक लाभांना नियमानुसार स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निकम यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.
पीएमपीएमएलमध्ये डिसेंबर 2025 मध्ये करण्यात आलेल्या पदोन्नती प्रक्रियेत पात्र आणि सेवाज्येष्ठ कर्मचार्यांना डावलण्यात आल्याचा निकम यांचा आरोप
आहे. पदोन्नती देताना सेवाज्येष्ठतेचे निकष, आरक्षणाच्या तरतुदी आणि बिंदू रोस्टरचे पालन झाले किंवा नाही, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच महामंडळाच्या मंजूर आस्थापना आराखड्यातील पदांची संख्या, उपलब्ध रिक्त जागा आणि पदोन्नतीसाठीची पात्रता यांचीही फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारींची दखल घेत महामंडळाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीने चौकशी करून अहवाल राज्य शासनाकडे सादर केल्याचे निकम यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र, या अहवालावर शासनाचा निर्णय किंवा पुढील अधिकृत कार्यवाही अद्याप झालेली नसल्यास संबंधित पदोन्नतींचे परिणाम कायम राहणे अन्यायकारक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले आहे.15 डिसेंबर 2025 नंतर देण्यात आलेल्या पदोन्नतींची स्वतंत्रपणे पडताळणी करावी, तसेच चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल आणि त्यावरील शासनाचे अभिप्राय मागवून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीचा अंतिम निष्कर्ष आणि शासनाचा निर्णय येईपर्यंत वाढीव वेतन व अन्य आर्थिक लाभांबाबत सक्षम प्राधिकार्याने सेवा नियमांच्या अधीन राहून अंतरिम आदेश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
पदोन्नती प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित पदोन्नत्यांबाबत सुधारात्मक कार्यवाही करावी. पात्र आणि सेवाज्येष्ठ कर्मचार्यांना झालेल्या अन्यायाचे निराकरण करून त्यांना नियमानुसार पदोन्नती व अनुषंगिक लाभ द्यावेत, अशी मागणीही निकम यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सद्य:स्थिती, शासनाशी झालेला पत्रव्यवहार आणि महामंडळाने केलेली कार्यवाही याबाबत लेखी उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, या प्रकरणात निर्णय घेण्यास विलंब झाल्यास कर्मचार्यांमध्ये असंतोष वाढून औद्योगिक संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता निकम यांनी व्यक्त केली आहे. या निवेदनाची प्रत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे.
Related
Articles
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अद्याप बंदच
05 Nov 2026
बंगालवर 10 गडी राखून विजय
06 Nov 2026
52 वृक्ष तोडण्यास नियमबाह्य परवानगी दिल्याबद्दल मुख्य उद्यान अधीक्षकांना नोटीस
09 Nov 2026
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा
07 Nov 2026
एमबीबीएस, बीडीएसच्या 138 रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी
05 Nov 2026
धनत्रयोदशी : धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)