E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
दिवाळीच्या गोडव्यात रंगणार शब्दांचा फराळ!
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
250 हून अधिक दिवाळी अंकांची मेजवानी; एकाच विषयाला वाहिलेल्या अंकांना पसंती
पुणे
: दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि मांगल्याचा उत्सव! घराघरांत दरवळणारा फराळाचा सुगंध मनाला तृप्त करतो, तर दिवाळी अंकांमधून दरवळणारा शब्दांचा सुगंध मनाला समृद्ध करतो. चकली, लाडू, करंजी आणि चिवड्याच्या चवीसोबतच कथा, कविता, ललित लेख, विनोद, वैचारिक मंथन आणि ज्ञानवर्धक लेखनाचा आस्वाद घेण्याची पर्वणी या अंकातून मिळते. या शब्दोत्सवाने यंदाही साहित्यविश्व सज्ज झाले असून, विविध विषयांची रंगतदार मेजवानी घेऊन सुमारे 170 ते 180 अंक बाजारात दाखल झाले आहेत. आणखी 70 ते 80 अंक बाजारात येणार आहेत.
दरवर्षी 200 पेक्षा अधिक अंक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. यंदा 250 ते 260 दिवाळी अंक बाजारात असणार आहेत. दिवाळी अंक ही केवळ वाचनाची परंपरा नाही, तर ती मराठी साहित्यविश्वाची समृद्ध सांस्कृतिक ओळख आहे. वर्षभराच्या धावपळीत हरवलेला निवांतपणा आणि स्वतःशी संवाद साधण्याची संधी हे अंक देतात. यंदाही या परंपरेचा वारसा जपत साहित्य, आरोग्य, विनोद, किल्ले, महिला, बालसाहित्य, ज्योतिष, रहस्यकथा, अध्यात्म आणि पर्यटन अशा विविध विषयांवर आधारित अंकांची मांदियाळी बाजारात सजली आहे. प्रत्येक अंकाचा विषय, त्याची मांडणी आणि मुखपृष्ठाची कल्पकता वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘केसरी’, ‘छावा’, ‘सह्याद्री’ वाघुर, मौज, हंस, अक्षरदान, फिरकी, ऋतुरंग, साधना, भूमिका, संस्कृती, दीपावली, वेदातश्री, आवाज, चौफेर समाचार, दुर्गांच्या देशातून, किल्ला, किशोर, मनशक्ती, खेळगडी, मिळून सार्या जणी, पृथा, भास आदी दिवाळी अंकांसह अन्य दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. यंदा एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेले दिवाळी अंकही मोठ्या संख्येने प्रकाशित झाले आहेत. एका विषयाचा सखोल वेध घेणारी लेखनाची मांडणी, अभ्यासपूर्ण लेख आणि वेगळ्या आशयाची निवड यामुळे या अंकांनी वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे नेहमीच्या साहित्यिक मेजवानीसोबतच विषयकेंद्रित अंकांची चव चाखण्याची संधीही वाचकांना मिळणार आहे. बदलत्या काळानुसार दिवाळी अंकांच्या प्रसिद्धी आणि प्रचाराच्या पद्धतींमध्येही नवे रंग भरले जात आहेत. पारंपरिक जाहिरातींसोबतच समाज-माध्यमांचा प्रभावी वापर करून संपादक आपल्या अंकातील साहित्य, लेखक, विषयवैशिष्ट्ये आणि मुखपृष्ठ वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. डिजिटल माध्यमांमुळे अंकांची ओळख नव्या वाचकांपर्यंत पोहोचत आहे. त्याचा अंकांच्या विक्रीलाही सकारात्मक लाभ होत आहे.
दिवाळी अंकाचे दर स्थिर
महागाई आणि वाढत्या छपाई खर्चाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी अंकांच्या किमतींबाबत संपादकांनी संयमाची भूमिका घेतल्याचे दिसते. सुमारे 90 ते 95 टक्के अंकांच्या किमती मागील वर्षीप्रमाणेच स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. तर केवळ पाच टक्के अंकांच्या किमतीत पाच ते दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाचकांच्या खिशाला फारसा अतिरिक्त भार न पडता शब्दांच्या या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.
दिवाळी अंकाचे आकर्षण कायम
दिवाळीच्या झगमगाटात काही क्षण पुस्तकांच्या सहवासात घालवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. फराळाच्या ताटातील पदार्थांची चव जशी जिभेवर रेंगाळते, तसाच दिवाळी अंकांतील एखादा विचार, कथा किंवा लेख मनात दीर्घकाळ रुंजी घालत राहतो. म्हणूनच काळ बदलला, माध्यमे बदलली, वाचनाच्या सवयी बदलल्या, तरी दिवाळी अंकांचे आकर्षण आणि त्यांची परंपरा आजही तितकीच जिवंत आहे. आगामी काही दिवसांत अंकांची संख्या आणखी वाढणार आहे. वाचकांची मागणीही कायम राहण्याचा अंदाज आहे.
- श्रीकांत भुतडा, संचालक पूनम एजन्सी.
Related
Articles
दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दहा लाखांची मदत
08 Nov 2026
म्हसवडच्या सिद्धनाथांचा मंगळवारपासून विवाह सोहळा
08 Nov 2026
सोमवती यात्रेनिमित्त खंडोबाचे दुपारी बारा वाजता कर्हा स्नान
07 Nov 2026
दुष्काळामुळे ‘अ’ वर्गातील १८ संस्थांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ
05 Nov 2026
सीएटलच्या दिवाळी उत्सवात रुढीवादी गटाचा गोंधळ
09 Nov 2026
वाचक लिहितात
10 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)