दुष्काळाच्या सावटात माणुसकीचा हात   

दुर्गम प्रतिष्ठानचा उपक्रम ठरला आधार

पुणे : भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात डोंगरावर वसलेल्या देहण, जळकेवाडी, झानेरी, मुर्‍हा गावांना सदाशिव पेठेतील दुर्गम प्रतिष्ठानतर्फे दिवाळी भेट सुपूर्द करण्यात आली. दुष्काळाच्या सावटात मदतीचा हात म्हणून राबविण्यात आलेल्या हा उपक्रम आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचितांसाठी आधार ठरला. अति दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने ’दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या रविवारी ‘दुर्गम’चे अध्यक्ष नंदकुमार जाधव, कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला.  गावातील 75 कुटुंबांना महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लँकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी 100 वस्तूंसह चारशे वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात केले. यावेळी देण्यात आलेल्या सौर कंदिलामुळे या वाड्यांचा अंधार दूर होण्यास मदत होणार आहे. गावातील 136 महिलांना साड्या, 109 मुलामुलींना, तसेच 200 ज्येष्ठ नागरिकांना नवीन कपडेही देण्यात आले.
 
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी व बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते दिवाळी साहित्याचे पूजन झाले. ’दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेचे स्वाती सेठ, राहुल सावदादकर, श्रीकांत मोरे, रवींद्र पठारे,  प्रमोद पवार, सुनंदा मोरे, स्वाती वाडेकर, निलेश जांभळे, गणेश काळे, अमोल कुटे, सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमासाठी रवि जाधव, श्रीप्रसाद गिरी, राजूशेठ गिरे, नितीन शहा, राहूल जाधव, संतोष कस्पटे, शिवराज कदम, सुरेश ढमढेरे, निवृत्ती झेंडे, अरविंद मोरे, राजेंश मोहोळ, दादा लाटे, सोनू ढमढेरे, राजेश शिंदे, दीपक पोकळे, रश्मी जाधव, करूणा कदम, रुपाली पटवर्धन, अपर्णा शेठ, श्रृती जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles