E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
अवैध उत्खनन प्रकरण
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून जिल्हाधिकार्यांना कारवाई करण्याचे निर्देश
पुणे
: इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे येथील गौण खनिज उत्खनन प्रकरणातील तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने जिल्हाधिकार्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल आणि त्यासंबंधीचे पुरावे 15 दिवसांत सादर करण्याचे सुचना आयोगाने दिल्याचे तक्रारदार वकील वैभव तानाजी धाईंजे यांनी सांगितले.
या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी धाईंजे यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासकीय स्तरावर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्याकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. यानंतर जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन प्रकरणातील तक्रारी आणि उपलब्ध कागदपत्रे सादर केली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, बारामती यांना आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे धाईंजे यांनी सांगितले. मात्र, अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनाकडे पुन्हा पाठपुरावा केला.
दरम्यान, तक्रारीची दखल घेत आयोगाने जिल्हाधिकार्यांकडून या प्रकरणातील कार्यवाहीचा अहवाल आणि संबंधित पुरावे मागविल्याचे समजते. या प्रकरणात संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित होते का, तसेच पुढील चौकशीत कोणत्या बाबी स्पष्ट होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणात नियमानुसार योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी वकील वैभव धाईंजे यांनी केली आहे.
संबंधीत अधिकार्यांवर कारवाई होणार?
इंदापूर तालुक्यातील 37 हजार 500 ब्रास गौण खनिज उत्खनन प्रकरणात तहसीलदारांच्या आदेशातील गंभीर विसंगती समोर आल्याचे वकील वैभव धाईंजे यांनी सांगितले. उत्खननाची मंजुरी, 40 लाखांच्या व्यवहाराचे कारण आणि अधिकारमर्यादेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. शेततळ्याच्या मंजुरीसंदर्भातील तपशील, दंडाच्या रकमेबाबतचे मुद्दे तसेच स्वामित्वधन माफीच्या तरतुदींच्या वापराबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून अधिकार्यांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
राष्ट्रीय मुद्द्यांवर विरोधकांनी अडवानींचा आदर्श घ्यावा : नितीन नवीन
09 Nov 2026
गोवत्स पूजनाने दीपावलीला प्रारंभ
06 Nov 2026
धाराशिवमधील येडशीत अग्नितांडव
10 Nov 2026
इथेनॉल खरेदीतील दुहेरी प्राधान्यामुळे वाद
07 Nov 2026
यूँ ही चला चल राही
06 Nov 2026
सेन्सेक्स २ हजार अंकांनी वधारला
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)