E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
हवेली तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
पुणे
: संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समिती हवेलीच्या वतीने व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला असून, जलसंधारण, मृदसंधारण, पाणी पुनर्भरण आणि चारा व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळ निवारण नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमांसाठी नाम फाउंडेशन आणि बायफ संस्थेसह विविध सामाजिक संस्थांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
चारा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. बायफ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे यांनी संस्थेच्या संशोधन कार्याची माहिती देत चारा व्यवस्थापन आणि पशुधन संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. नाम फाउंडेशनचे मल्हार नानासाहेब पाटेकर यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी यंत्र नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. तसेच आदर पूनावाला फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत माहिती देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले.यावेळी उपसभापती विद्या गायकवाड, गटविकास अधिकारी शेखर शेलार, नाम फाउंडेशनचे मल्हार नानासाहेब पाटेकर, आदर पूनावाला क्लीन सिटीचे व्यवस्थापक मल्हार करवंदे, बायफ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे, लघुपाटबंधारे, बांधकाम, पशुसंवर्धन आणि नरेगा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत हवेलीचा समावेश करण्याची मागणी
दुष्काळ निवारण नियोजन बैठक संपल्यानंतर उपस्थित पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी यांची भेट घेतली. हवेली तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
जमिनीतील नैसर्गिक जलपुनर्भरण वाढविण्याच्या उद्देशाने ’जलतारा’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पंचायत समिती हवेली, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
- युवराज काकडे सभापती पंचायत समिती हवेली.
Related
Articles
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
05 Nov 2026
मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडणे गरजेचे
08 Nov 2026
जगभरातील बाजारात घसरण; सेन्सेक्सची उसळी कायम
07 Nov 2026
दांडेकर पुलाजवळ उजव्या मुठा कालव्याला गळती
09 Nov 2026
एसआरएचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे द्या
09 Nov 2026
१२ नोव्हेंबरपासून पंढरपुरात भूसंपादनाचे तात्पुरते कार्यालय सुरू
11 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)