E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
सोमालियाजवळ मासेमारी नौकेची समुद्र चाच्यांच्या तावडीतून सुटका
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
मार्कोस कमांंडो उतरवले; २० खलाशी सुुखरूप
नवी दिल्ली : हिंद महासागरात भारतीय नौदलाने आक्रमक कारवाई करुन एका भारतीय मासेमारी नौकेची सुटका समुद्र चाच्यांच्या तावडीतून केली. ४८तासांहून अधिक काळ मोहीम राबविण्यात आली. सोमालियाच्या किनारपट्टीजवळ अपहृत नौकेवर मार्कोस कमांडो उतरवून २० खलाशांची सुखरुप सुटका करण्यात यश आले.
’अझिनी’ नावाच्या नौकेचे अपहरण समुद्री चाच्यांनी केले होते. नौकेसह सर्व २० खलाशांना ताब्यात ठेवले होते. कारवाईत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती नौदलाने मंगळवारी दिली.
नौदलाने कारवाईबाबत अधिक सांगितले की, गेल्या महिन्यात नौकेचे अपहरण करण्यात आले होते. व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी या नौकेचा वापर झाला असता. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई करणे आवश्यक होते. नौदलाने एका युद्धनौकेला कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच सागरी टेहळणी करणार्या विमानाचीही मदत घेण्यात आली होती. नौकेचा शोध घेण्यात आला, तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आणि अत्यंत अचूकपणे कारवाई केली. या मोहिमेत भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानाद्वारे मार्कोस कमांडो नौकेवर उतरविण्यात आले. भारतीय नौदलाने नौकेचा ताबा मिळवला, चाच्यांचा डाव उधळून लावत सर्व २० खलाशांची सुरक्षित सुटका केली आहे. हिंद महासागरात प्रामुख्याने सोमालीया, एडन या सारख्या प्रदेशात समुद्र चाच्यांचा वावर मोठा आहे. जहाजे, नौकांचे अपहरण करून ते खंडणी उकळतात.
Related
Articles
दिवाळीच्या गोडव्यात रंगणार शब्दांचा फराळ!
04 Nov 2026
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 1 हजार 746 कोटींच्या कर्जाचा डोंगर
09 Nov 2026
अवैध उत्खनन प्रकरण
04 Nov 2026
कमांडर
09 Nov 2026
बॅडमिंटनपटू तन्वीला रौप्यपदक
07 Nov 2026
पदोन्नतीतील अनियमिततेची चौकशी पूर्ण होईपर्यंत आर्थिक लाभ रोखा
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित