E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
ट्रम्प बहुमत टिकवणार का? याचा निर्णय होणार
वॉशिंग्टन : अमेरिकेत मंगळवारी मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात निवडणूक होत आहे. त्याद्वारे १२० व्या अमेरिकन काँग्रेसची निवड करण्यासाठी प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी आणि सिनेटच्या १०० पैकी ३५ जागांसाठी निवडणूक होत आहे. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष की प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्ष बाजी मारतो ? याकडे जगाचे लक्ष लागले आहे. तसेच ट्रम्प बहुमत टिकविणार की नाही ? याचा निर्णयही होणार आहे.
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सर्वसाधारणपणे दोन वर्षांनी मध्यावधी निवडणुका होत असतात. प्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या प्रतिनिधींची निवडणूक घेतली जाते. त्यासाठी काल मतदान सुरू झाले. एकोणतीस राज्ये आणि प्रदेशांमधील अमेरिकी गव्हर्नरपदाच्या निवडणुका, अॅटर्नी जनरलपदाच्या निवडणुका, तसेच अनेक राज्ये आणि स्थानिक निवडणुकाही सोबत होत आहेत.
निवडणुकीपूर्वी अमेरिकेतील इंधन वाढ, आरोग्यसेवा आणि अन्नधान्याच्या किमतींसह परवडण्याजोग्या वस्तूंच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महागाईत मोठी वाढ झाली. जकातींच्या माध्यमातून अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी करवाढ लादून संघीय महसूल वाढवण्यात आला. विविध निर्णयांमुळे मतदारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय मंडळी स्वार्थी बनल्याचा समज निर्माण झाला आहे. लोकशाहीची पीछेहाट, असमानता, मोठ्या प्रमाणावरील पाळत आणि परराष्ट्र धोरणातील ट्रम्प यांचे अपयश आणि फजिती देखील निवडणुकीतील कळीचे मुद्दे आहेत. इराण युद्ध, पारंपरिक मित्र देशांशी वाढता तणाव आणि संघर्ष, रशियासोबत जवळीक, सक्तीचा विस्तारवाद आणि कॅथोलिक चर्च व पोप लिओ चौदावे यांच्याशी वाढता दुरावा यांचे पडसाद निवडणुकीत उमटणार आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनाने सिलिकॉन व्हॅलीशी संबंध दृढ करत कृत्रिम महाबुद्धिमत्तेच्या (एएसआय) विकासाला प्रोत्साहन दिले. कृत्रिम सामान्य बुद्धिमत्तेमुळे (एजीआय) होणारी भविष्यातील नोकरीची घट, डेटा सेंटर्सची उभारणी, पर्यावरणावरील परिणाम आणि एएसआयमुळे निर्माण होणारा अस्तित्वाचा धोका यावर नागरिकांकडून तीव्र विरोध झाला आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीशी सुसंगत राहण्यासाठी ठिकाणांची नावे बदलण्यात आली, ज्यात लेक ओंटारियो (लेक अमेरिका) आणि मेक्सिकोचे आखात (गल्फ ऑफ अमेरिका) यांच्या नावांचा समावेश होता, तर डेमोक्रॅट्सनी या बदलांना लक्ष विचलित करण्याचा प्रकार म्हटले होते.
ट्रम्प यांना वेसण ?
दोन्ही सभागृहांत नव्याने सदस्य निवडले जात आहेत. त्यामुळे अनेकदा विरोधी पक्षांच्या सदस्यांची संख्या ही सत्ताधारी पक्षापेक्षा अधिक असते. त्यामुळे एकतर्फी निर्णय घेताना अध्यक्षांसमोर पेचप्रसंग निर्माण होतो. आता रिपब्लिकन पक्षाचे बहुमत केवळ पाच सदस्यांनी अधिक आहे. निवडणुकीनंतर ही दरी वाढली तर ट्रम्प यांना आपले निर्णय घेताना हात आखडता घ्यावा लागणार आहे. मनमानी केली तर विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहेत. त्यांच्या बेफाम सत्तेला लगाम बसेल, असे मानले जात आहे. ही निवडणूक ट्रम्प यांना वेसण घालणारी ठरणार की नाही ? हे निकालानंतर स्पष्ट होईल.
Related
Articles
वगळलेल्या मतदारांना आयोगाकडून नवी संधी
07 Nov 2026
मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडणे गरजेचे
08 Nov 2026
‘फेडरल रिझर्व’च्या निर्णयावर सोन्याचे भाव अवलंबून
03 Nov 2026
संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीज कनेक्शन जोडू नका
05 Nov 2026
कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण
05 Nov 2026
राष्ट्रीय मुद्द्यांवर विरोधकांनी अडवानींचा आदर्श घ्यावा : नितीन नवीन
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित