E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
बंडगार्डन पुलाचे विद्रुपीकरण
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
नदीपात्रात कचरा टाकल्याने प्रदूषणात वाढ
बंडगार्डन
: शहरातील ऐतिहासिक आणि वर्दळीचा भाग असलेल्या बंडगार्डन परिसरातील नवीन पुलावर नागरिकांकडून आणि स्थानिक व्यावसायिकांकडून सातत्याने कचरा टाकला जात असल्याने या परिसराचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण झाले आहे. स्वच्छ आणि सुंदर पुण्याचे नारे दिले जात असताना, नागरिकांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे पुलावर दुर्गंधी पसरली असून मुळा-मुठा नदीच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
व्यावसायिक आणि घरगुती कचर्याचे साम्राज्य
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत असे समोर आले की, केवळ रात्रीच्या वेळीच नव्हे, तर भरदिवसाही अनेक नागरिक पुलावरून थेट नदीपात्रात प्लास्टिक पिशव्या, निर्माल्य आणि घरगुती कचरा फेकत आहेत. याशिवाय, परिसरातील काही हॉटेल व्यावसायिक आणि किरकोळ विक्रेते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ओला व सुका कचरा, थर्मोकोल आणि प्लास्टिकचे मोठे गठ्ठे पुलाच्या कडेला व खाली आणून टाकत आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीच्या अस्तित्वाला धोका
पुलावरून टाकला जाणारा हा कचरा थेट मुळा-मुठा नदीच्या पात्रात जात असल्याने नदीचे पाणी कमालीचे दूषित झाले आहे. पुणे महानगरपालिकेने नदीतील प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी बंडगार्डन परिसरात ’फ्लोटिंग ट्रॅश बॅरियर’ (तरंगते कचरा प्रतिबंधक) बसवले असले, तरी दररोज पुलावरून टाकल्या जाणार्या कचर्याचे प्रमाण एवढे मोठे आहे की या यंत्रणेवरही प्रचंड ताण येत आहे. नदीपात्रात साचलेल्या प्लास्टिकमुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे.
सीसीटीव्हीची मागणी
विद्रुपीकरणामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सजग नागरिकांनी काही कचरा टाकणार्यांना रंगेहाथ पकडून जाब विचारला असून, या समस्येबाबत महापालिकेकडे लेखी तक्रारीही नोंदवल्या आहेत. प्रशासनाने या पुलावर तातडीने सीसीटीव्ही बसवावेत आणि कचरा टाकणार्यांवर ’न्यूसन्स डिटेक्टिव्ह’ पथकाद्वारे मोठी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Related
Articles
मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल
03 Nov 2026
वाहनावरील दंडाच्या थकबाकी वसुलीसाठी सरकारची अभय योजना
05 Nov 2026
युरोप-कॅनडाची जवळीक; अमेरिकेच्या व्यापार धोरणाला पर्याय?
03 Nov 2026
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 1 हजार 746 कोटींच्या कर्जाचा डोंगर
09 Nov 2026
रशियाचा युक्रेनवर हवाई हल्ला; ४० जणांचा मृत्यू
06 Nov 2026
धाराशिवमध्ये ऐन दिवाळीत एका अग्नितांडव !
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित