E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
शहा यांनी दिलेले चर्चेचे आव्हान राहुल यांनी स्वीकारावे
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
जेडीयूचे आवाहन
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदार यादी विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेबाबत दिलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारावे, असे आवाहन संयुक्त जनता दलाने (जेडीयू) दिले आहे. तसेच राहुल गांधी यांनी अराजक दृष्टिकोन सोडावा, असेही म्हटले आहे.
राहुल गांधी यांना ज्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, त्यांनी ते संसदेत मांडावेत, असे जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी सांगितले. तसेच, राहुल यांना संसदीय लोकशाहीवर थोडाही विश्वास असेल तर त्यांनी शहा यांचे चर्चेचे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे सांगितले. निवडणूक आयोगाला एसआयआर प्रक्रिया राबवण्याचा अधिकार असून ही प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच केली जात असल्याचे बिहारमधील एसआयआर प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते, असेही ते म्हणाले.देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसेल आणि संसदीय लोकशाहीवरही श्रद्धा नसेल, तर हा अराजक दृष्टिकोन म्हणावा लागेल, अशा शब्दांत राहुल यांच्यावर टीका केली.
Related
Articles
छळाला कंटाळून व्यावसायिकाच्या सुनेची आत्महत्या
03 Nov 2026
मेळघाटच्या आदिवासी महिलांनी विणलेली शाल पंतप्रधानांना भेट
04 Nov 2026
विराटच्या अर्धशतकीय खेळीने भारताचा विजय
05 Nov 2026
भावा, मला ज्ञानेश दे !
05 Nov 2026
महापालिकेच्या विरोधात खटले लढवणार्या पॅनेलवरील वकिलांना दिलेले मानधन वसूल करणार
06 Nov 2026
अक्षय झांबरे याला चार दिवसांची कोठडी
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित