E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
आंध्र प्रदेशाला ‘मुरासू’ चक्रीवादळाचा तडाखा
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
नवी दिल्ली : ‘मुरासू’ चक्रीवादळ मंगळवारी पहाटे आंध्र प्रदेशाची किनारपट्टी ओलांडून पुढे गेले. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) उपमहानिरीक्षक मोहसेन शाहिदी यांनी सांगितले.‘अर्नब’ नंतर ‘मुरासू’ चक्रीवादळाने काल आंध्रच्या किनारपट्टीवर मोठा विध्वंस घडवून आणला. यात हजारो झाडे उन्मळून पडली असून, शेकडो विजेचे खांब कोसळले आहेत. तसेच, मासेमारी नौकांचे नुकसान झाले आहे.
‘मुरासू’ चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर ओडिशाच्या दिशेने केले. त्यामुळे ओडिशाच्या कोरापुट, मलकानगिरी, कंधमाल, कालाहांडी अन्य काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे काल पहाटे ‘मुरासू’ चक्रीवादळात रुपांतर झाले. त्यानंतर, ते आंध्र प्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे राज्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यांसह मुसळधार पाऊस झाला.
आंध्रच्या किनारपट्टीवरील सुमारे १.७५ लाख नागरिकांना चक्रीवादळाचा फटका बसला. चक्रीवादाळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची ३८ पथके बचाव आणि मदत कार्यासाठी आधीच तैनात करण्यात आली होती. तर, दहा हजार नागरिकांना सुरिक्षत ठिकाणी आश्रय देण्यात आला होता. चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. अनेक सखल भागात पाणी साचल्याचे आणि वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशासह ओडिशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. या दोन्ही राज्यांत अंगणवाड्या आणि शाळा आज (बुधवारी) देखील बंद राहणार आहेत. ओडिशात एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन दलासह आपत्ती प्रतिसाद दलांची ३०० हून अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
06 Nov 2026
केवळ घुसखोरांच्या संरक्षणासाठी इंडिया आघाडीचा महामेळावा : सुवेंदू
04 Nov 2026
वाहनावरील दंडाच्या थकबाकी वसुलीसाठी सरकारची अभय योजना
05 Nov 2026
भारताविरोधात अमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र
04 Nov 2026
ज्येष्ठ चित्रकार अर्पिता सिंग यांचे निधन
09 Nov 2026
जायकवाडीच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित; शेतकर्यांना दिलासा
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित