नॅशनल कॉन्फरन्सला धक्का; आगा रुहुल्ला यांचा राजीनामा   

बडगाम : श्रीनगरचे खासदार सय्यद आगा रुहुल्ला मेहदी यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. मागील काही महिन्यांपासून त्यांचे पक्ष नेतृत्वाशी मतभेद सुरू होते. आगा रुहुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका सभेत याबाबतची घोषणा केली. तसेच, पक्ष नेतृत्वावर जोरदार टीक केली. तसेच,  नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले. रुहुल्ला हे शिया समुदायातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात.

Related Articles