E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
सोलापूर
, (प्रतिनिधी) : गोवा राज्यात निर्मित मद्याची बेकायदा वाहतूक करणार्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने इचगाव टोलनाक्यावर कारवाई केली. या कारवाईत २३८ बॉक्समधील विदेशी मद्याच्या ३ हजार ८८८ बाटल्या, बिअरच्या २६४ बाटल्या आणि मोटार असा एकूण ३० लाख ९१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एक गुन्हा दाखल करून दोघांवर कारवाई करण्यात आली.
३१ ऑक्टोबर रोजी मिरज-सोलापूर महामार्गावरील इंचगाव टोलनाका, ता. मोहोळ येथे ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात मोठी मोहीम राबविली. या कालावधीत एकूण १ हजार ८२५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एक हजार ९२५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १० कोटी २२ लाख ९७ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जागा मालकांवरही कारवाई
अवैध ढाब्यांवर मद्यविक्री करणे, बेकायदा मद्यनिर्मिती, वाहतूक आणि मद्याचा साठा करण्यासाठी वापरण्यात येणार्या जागांच्या मालकांनाही या कारवाईत आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध मद्यव्यवसायाला जागा उपलब्ध करून देणार्यांवरही विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जे. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके, जवान अनिल पांढरे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले, मंगेश मारसिंग आणि स्वप्नील यरमाळ यांनी परिश्रम घेतले.
पुणे येथे मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विषारी दारूच्या सेवनामुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपी अंधत्व येणे तसेच अकाली मृत्यू होण्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वस्त मद्याच्या आमिषाला बळी पडू नये, अनधिकृत ठिकाणांहून मद्य खरेदी करू नये आणि अवैध मद्याबाबतची माहिती विभागाला द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
Related
Articles
राज्य टेनिक्वाइट स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व
05 Nov 2026
परदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन
09 Nov 2026
दहावी, बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
05 Nov 2026
दुसरी ते आठवीच्या संकलित मूल्यमापन चाचणी-2 परीक्षेचे वेळापत्रक बदलले
09 Nov 2026
बुमरा, जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर लक्ष
07 Nov 2026
शेअर बाजाराची कोंडी
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)