E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
पार्थ व जय पवारांमध्ये वाद निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
भुजबळ, मुश्रीफ वगळता बाकीच्या नेत्यांनी अजित पवार यांना त्रास दिला रोहित पवार यांचा आरोप
मुंबई, (प्रतिनिधी) : छगन भुजबळ, हसन मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित पवार यांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितले होते. परवा हे सगळे नेते अमित शहा यांना भेटायला गेले होते. सुनेत्रावहिनी व पार्थ पवार यांना एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. आधी काका-पुतण्यामध्ये दरी निर्माण केली. आता पार्थ व जय पवार यांच्यात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल अजित पवार गटात पडलेल्या दुफळीवरून गंभीर आरोप केले. पार्थ पवार आणि सुनेत्रा काकींना एकटे पाडले जात आहे. परवा जे नेते शहा यांना भेटायला गेले होते, त्या सर्वांना शरद पवार यांनी संधी दिली होती. भुजबळ आणि मुश्रीफ यांच्यासारखे मोठे नेते सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित पवारांना त्रास दिला हे दादांनी मला स्वतः सांगितल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. काही दिवसांपूर्वी जय पवार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. काका पुतण्यामध्ये भाजपने वाद लावला आहे. आता तसच दोन भावांमध्ये देखील भाजप वाद लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पार्थ आणि नेत्यांमध्ये संवाद नसल्यामुळे पार्थ आणि सुनेत्रा काकींचा कंट्रोल कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका नेत्याला अर्थ खात हवे आहे. पूर्वी केंद्रात मंत्री राहिलेल्या एकाला परत मंत्री व्हायचे आहे.
त्यासाठी प्रयत्न करणार्या लोकांनी परवा शहांकडे बारामती विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली असती तर बरे वाटले असते. पार्थ, जय आणि सुनेत्रा काकी यांनी भाजप आणि जवळच्या नेत्यांची खेळी समजून घेतली पाहिजे. दादा गेल्यावर पार्थला पद मिळाले पण जवळच्या लोकांपासून काळजी घेतली पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
विलीनीकरणाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, ते नेते भाजप सोडून आमच्याकडे येत असतील तर आमचा विरोध असायचे कारण नाही. पवारांनी कायम भाजपच्या धोरणाला विरोध केला आहे. त्यात सुप्रियाताईंनी विरोध केला. त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर नाही. पण, जर ते भाजपचा विरोध करणार असतील तर आम्ही त्यांना सोबत घेऊ.
Related
Articles
शमीने वेगवान गोलंदाजीच्या एका युगाला आकार दिला : बीसीसीआय
09 Nov 2026
अभिनेता इम्रान याचा माफीनामा!
03 Nov 2026
वाचक लिहितात
03 Nov 2026
दिवाळीचे अप्रूप आणि आकर्षण राहिले आहे का?
05 Nov 2026
महापालिकेच्या विरोधात खटले लढवणार्या पॅनेलवरील वकिलांना दिलेले मानधन वसूल करणार
06 Nov 2026
अमली पदार्थांचा चोरटा व्यापार
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित