जिल्ह्यातील १७० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा   

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी १७० गावे व ८५३ वाड्यांमधील ३ लाख ४३ हजार ९११ नागरिकांना व ९९ हजार १२६ पशुधनाला १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय ४८ विहिरी व २४ बोअर असे एकूण ७२ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता व्ही.डी. राठोड यांनी दिली.मंगळवेढा ४२ गावे - ४५ टँकर, सांगोला २८ गावे - ३९ टँकर, अक्कलकोट १९ गावे - १३ टँकर, माढा १६ गावे - २१ टँकर, बार्शी १७ गावे - ६ टँकर, करमाळा १४ गावे - ११ टँकर, माळशिरस ११ गावे - ११ टँकर, उत्तर सोलापूर ९ गावे - १६ टँकर, दक्षिण सोलापूर ७ गावे - १० टँकर, मोहोळ ७ गावे - ११ टँकर असून पंढरपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.

Related Articles