दिया प्रकरणावरुन न्यायालयाने फटकारले   

मुंबई : दिवाळी फटाके न फोडण्याचे आवाहन करणार्‍या अभिनेत्री दिया मिर्झा हिचा व्हिडीओ समाज माध्यमावर पुन्हा अपलोड करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. 
 
तसेच, या प्रकरणावरुन आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या राजकीय नेत्यांना न्यायलयाने फटकारले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांनी भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, याची आठवण करुन देत राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

Related Articles