E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
ऊस दर जाहीर करण्यासाठी कारखानदारांना प्रशासनाचा तीन दिवसांचा अल्टिमेटम
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
शेतकरी संघटनांच्या मागण्यांची दखल; शेतकर्यांच्या हिताचा विचार करून योग्य दर द्यावा
सोलापूर
, (प्रतिनिधी) : ऊस गाळप हंगाम २०२६-२७ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊस दरासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत संघटनांनी सादर केलेल्या मागण्यांबाबत जिल्ह्यातील सर्व संबंधित साखर कारखानदारांना अवगत करण्यात आले असून, पुढील तीन दिवसांत योग्य ऊस दर जाहीर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दरासह विविध प्रश्नांवर निवेदन सादर केले. शेतकर्यांच्या मागण्यांची प्रशासनाने दखल घेत या मागण्या साखर कारखानदारांपर्यंत पोहोचवल्या. कारखानदारांनी शेतकर्यांच्या हिताचा विचार करून योग्य दर जाहीर करावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निर्हाळी, अभिजित पाटील, किरण गायकवाड, नानासाहेब रुपनवर, बी. सी. पवार, विष्णू डोके आणि संतोष मानूरकर उपस्थित होते. तसेच सुहास पाटील, विजय रणदिवे, नामदेव पवार, अनिल पाटील मोहोळचे प्रभाकर देशमुख यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Related
Articles
52 वृक्ष तोडण्यास नियमबाह्य परवानगी दिल्याबद्दल मुख्य उद्यान अधीक्षकांना नोटीस
09 Nov 2026
मुख्यमंत्री सहायता निधीस विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दोन कोटींची मदत
05 Nov 2026
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालयाचे गुरुवारी उद्घाटन
03 Nov 2026
रशियाचा युक्रेनवर हवाई हल्ला; ४० जणांचा मृत्यू
06 Nov 2026
तोतया निवडणूक निरीक्षक जाळ्यात
03 Nov 2026
सौदी अरेबियाने हवेतच रोखली क्षेपणास्त्रे
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित