सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेत आणखी सुधारणा करा   

मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

सोलापूर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक सुविधांच्या पूर्ततेवर विशेष भर द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिले.मंत्री सरनाईक यांनी आज सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहे, पाणपोई आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी केली. बसस्थानकात झालेल्या सुधारणांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत अद्याप सुधारणा करण्यास मोठा वाव असून, बसस्थानक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील प्रवाशांशी थेट संवाद साधला. एसटीच्या नवीन बसेसबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशीच दर्जेदार सेवा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रवाशांनी स्थानिक समस्याही मांडल्या.

Related Articles