E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
भारताविरोधात अमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
पिंपरी
: जगातील अनेक देशांना भारताची प्रगती पाहवत नाही. ते भारताशी लढूही शकत नाहीत. भारत शक्तिशाली देश आहे. त्यामुळे या देशांनी भारताच्या विरुद्ध छुपे युद्ध सुरु केले आहे. त्यातून देशात अमली पदार्थ आणण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन तस्करी करुन भारतात अमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न होत आहेत. या युद्धाची सुरुवात पंजाबपासून झाली असून, तेथील परिस्थिती भारताच्या इतर राज्यात करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडे येथे झालेल्या जागेच्या सातबारा उतार्याचे हस्तांतरण, एआय आधारित सीसीटीव्ही व आयटीएमएस प्रकल्पाचा शुभारंभ, पिंपरी पोलीस संकुलाचे भूमीपूजन, आधुनिक वाहने, साधनसामुग्रीचे लोकार्पण, नशामुक्त अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, गृहराज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर रवि लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही रसायने एकत्रित करुन कृत्रिम अमली पदार्थ तयार करता येतात. घरांमध्ये अमली पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे. कृत्रिम अमली पदार्थामुळे तरुणाई संपत आहे. व्यवसनाधीन झालेली तरुणाई पैशांसाठी गुन्हेगारीकडे वळते. खून करण्यापासून आई-वडिलांना मारण्याच्या घटनाही पहायला मिळतात. त्यामुळे अमली पदार्थमुक्त करण्यासाठीचे आव्हान मोठे आहे. अमली पदार्थाच्या पुरवठ्यावर, मागणीवर नियंत्रण आणले जाणार आहे. व्यसनाधीन झालेल्यांना योग्य उपचार दिले जाणार आहेत. अमली पदार्थासाठी रसायन तयार करणार्यांवर नियंत्रण ठेवले जाईल. बाहेरुन येणारा माल सीमेवर अडविला जाणार आहे. पुरवठ्याची साखळी मोडून काढली जाणार आहे. बंद पडलेल्या कारखान्यातून अमली पदार्थाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न होतो. बंद पडलेले रसायन निर्मिती कारखान्यांची तपासणी केली जाणार आहे. अमली पदार्थाचे कारखाने नेस्तनाबूत केले जाणार आहेत.
ही लढाई आपल्या घरी लढावी लागेल. आई-वडिलांनाही मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. अमली पदार्थ विकणारा आणि घेणार्याच्या पाठिशी कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे. खोकला झाल्यानंतर कोडीनयुक्त औषध नसेसाठी वापरले जाते. या औषधाचाही हिशोब ठेवला जात आहे. युवा शब्द उलटा केला तर वायू शब्द बनतो. वायू चक्रीवादळाच्या स्वरुपात आल्यास समाजाला उद्धवस्त करतो. तोच वायू प्राणवायू झाला तर जगण्याला मदत करतो. युवा शक्तीला प्राणवायूत परिवर्तीत करायचे झाल्यास त्याला शक्ती द्यावी लागणार आहे. त्यासाठी स्वत:च्या घरापासून नशामुक्तीचे अभियान सुरु करण्याचे’ आवाहनही त्यांनी केले.
राज्यात ’एआय’ आधारित तपास सारथी
राज्यात एआय आधारित तपास सारथी सुरु केली जात आहे. त्यामुळे घटना घडताच न्यायवैद्यक पुरावे जमा केले जातात. हे पुरावे ’ब्लॉकचेन’मध्ये घेतले जातात. तपास सुरु झाल्यापासून न्यायालयात खटला जाईपर्यंत आणि पुराव्याचे व्यवस्थापन ’ब्लॉकचेन’च्या माध्यमातून तयार केले जात आहे. खटल्याचे आरोपपत्र तयार करणे, जबाब घेणे, त्याचे चित्रिकरण केले जाते. यामाध्यमातून गुन्हेगारीवर वचक बसविता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Related
Articles
झेंडू व शेवंतीने भाव खाल्ला : आवक घटली
09 Nov 2026
सिंधू वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र
05 Nov 2026
इराणवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले
07 Nov 2026
कळसपिंपरीत दहा क्विंटल कापूस जळून खाक
09 Nov 2026
दूरगाव तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा थांबविण्याची मागणी
09 Nov 2026
पद्मावती मेट्रो स्थानकासाठी महापालिका देणार 665 चौरस मीटर जागा
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)