E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
ईडन पार्कची उसळती खेळपट्टी आव्हानात्मक
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने एकदिवसीय मालिका महत्त्वाची
ऑकलंड
: आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका महत्त्वाची ठरणार आहे. ऑकलंडमधील ईडन पार्कची उसळती खेळपट्टी दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे फलंदाजांसह वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. ईडन पार्कवर शुक्रवारी झालेल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने 20 षटकांत 259 धावा केल्या होत्या. मात्र, एकदिवसीय सामन्यांसाठी येथील खेळपट्टी तुलनेने कमी सपाट ठेवली जाण्याची शक्यता आहे. 2007 मध्ये नोंदवलेली 340 धावांची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आजही कायम आहे.
विशेष म्हणजे, ऑकलंडमधील मागील दोन एकदिवसीय सामन्यांत रात्रीच्या वेळी फलंदाजी करणारे संघ अनुक्रमे 150 आणि 76 धावांत गारद झाले होते. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स याच्या मते, पर्थनंतर ईडन पार्कची खेळपट्टी जगातील सर्वाधिक उसळी देणार्या खेळपट्ट्यांपैकी एक आहे. येथे चेंडूला उसळीसोबत स्विंग आणि सीम मूव्हमेंट मिळाल्यास गोलंदाजांचे पारडे जड राहू शकते. भारतासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कामगिरी महत्त्वाची असेल. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर उसळत्या खेळपट्ट्यांवरील त्यांचा फॉर्म तपासण्याची ही संधी आहे. रोहितला न्यूझीलंडमध्ये अद्याप एकदिवसीय शतक झळकावता आलेले नाही.
अय्यरचे पुनरागमन
सरावादरम्यान मॅट हेन्रीशी झालेल्या धडकेत डेव्हॉन कॉनवेला दुखापत झाली असून, तो पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. हेन्रीच्या खेळण्याबाबतही अनिश्चितता आहे. मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र हे संघाबाहेर आहेत. त्यामुळे टिम सेफर्टला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघात बुमरा आणि हार्दिक अनुपस्थित असतील. मात्र, श्रेयस अय्यरचे पुनरागमन अपेक्षित असून, चौथ्या क्रमांकावर त्याला संधी मिळू शकते.
न्यूझीलंडचा संभाव्य संघ : विल यंग, टिम सेफर्ट/हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, मॅट हेन्री/ब्लेअर टिकनर, जेकब डफी.
भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
Related
Articles
संवत्सर संपेपर्यंत लक्ष्मीची ’पूजा अर्चा’ करा
09 Nov 2026
अर्ज बाद झाला; तरी माघार नाही
06 Nov 2026
फटाक्यांवर मुंबईत बंदी
10 Nov 2026
धनत्रयोदशी : धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य
06 Nov 2026
शेख हसीना यांना सोपवा ; कायदा मंत्र्याची मागणी
09 Nov 2026
वृद्धत्वाकडे नव्हे, आनंदी ज्येष्ठत्वाकडे जा
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)