E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
पुरूष सांघिक 50 मीटर नेमबाजीत भारताला सुवर्ण
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
विश्व अजिंक्यपद स्पर्धा
दोहा
: भारताच्या रविंदर सिंह, सौरभ चौधरी आणि अमनप्रीत सिंह या तिघांनी मंगळवारी येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.या स्पर्धेत रविंदर सिंहने वैयक्तिक रौप्यपदकाचीही कमाई केली. विशेष म्हणजे, 50 मीटर पिस्तूल हा प्रकार ऑलिम्पिक स्पर्धांच्या यादीत समाविष्ट नाही. रविंदर हा भारतीय नेमबाजांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू ठरला. त्याने एकूण 559 गुणांची नोंद केली. अनेकदा विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्या सौरभ चौधरीने 551 गुण मिळवले, तर अमनप्रीत सिंहने 549 गुणांची कमाई केली. या तिघांच्या एकत्रित कामगिरीच्या जोरावर भारताने 1659 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. चीनच्या झांग बिंगचेन, ल्यू जुनयी आणि फेंग लिनलांग या संघाने 1648 गुणांसह रौप्यपदक पटकावले. तर दक्षिण कोरियाच्या होंग सुह्योन, चोए बोरम आणि सो सेउंग सेओब यांच्या संघाने 1643 गुण मिळवत कांस्यपदकाची कमाई केली. वैयक्तिक प्रकारात रशियाच्या अँटोन अरिस्तारखोवने 561 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. रोमानियाच्या लुका झोल्डियाने 558 गुणांसह कांस्यपदक मिळवले.या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले असून, पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.
Related
Articles
दिवाळीच्या सुट्टीत बालचमूंचा गड-किल्ले उभारण्याचा उत्साह
07 Nov 2026
दुष्काळग्रस्त भागांची गोखले संस्थेकडून पाहणी; दीड महिन्यात शासनाला अहवाल
06 Nov 2026
भेदक गोलंदाजीमुळे भारताचा विजय
08 Nov 2026
अवजड वाहने लोणंदमार्गे वळवली
05 Nov 2026
श्रीनगरच्या लाल चौकामध्ये चार दहशतवाद्यांची छायाचित्रे
09 Nov 2026
दिवाळीच्या प्रकाशाचा खरा अर्थ?
10 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)