E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
यशस्वी जैस्वालचे नाबाद 155
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
कसोटी अनिर्णित
क्राइस्टचर्च
: भारत ’अ’ आणि न्यूझीलंड ’अ’ यांच्यातील दुसरा अनधिकृत कसोटी सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या तिसर्या दिवशी भारत ‘अ‘ ने दुसर्या डावात 2 बाद 282 धावा केल्या. यशस्वी जैस्वालच्या नाबाद 155 आणि यश राठोडच्या नाबाद 100 धावांच्या खेळीमुळे भारताने सामना अनिर्णित राखला.
यशस्वी जैस्वालने 162 चेंडूंत 15 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 155 धावा केल्या. यश राठोडनेही 122 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. दोघांनी तिसर्या विकेटसाठी नाबाद 247 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन 11, तर देवदत्त पडिक्कल शून्यावर बाद झाले. भारत ‘अ‘ ने पहिल्या डावात 346 धावा केल्या होत्या. कर्णधार ध्रुव जुरेलने 171 चेंडूंत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 105 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने 80, आकाश दीपने 68 धावा केल्या.
न्यूझीलंड ‘अ‘ ने पहिल्या डावात 424 धावा करत 78 धावांची आघाडी मिळवली. मॅथ्यू बॉयलने 110, तर डीन फॉक्सक्रॉफ्टने 93 धावांचे योगदान दिले. क्रिस्टियन क्लार्कने 41, फ्रेझर शीएटने 40 आणि जारोड मॅकेने 33 धावा केल्या. भारत-अ कडून मुकेश कुमारने पाच, मोहम्मद सिराजने चार बळी घेतले. न्यूझीलंड‘अ‘ च्या 78 धावांच्या आघाडीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसर्या डावात दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला.
Related
Articles
भारत-श्रीलंका सामना विशाखापट्टणमला
07 Nov 2026
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूटमार
03 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
‘द पुणे फाऊंटन पेन शो’तर्फे हस्ताक्षर स्पर्धेचे परितोषिक वितरण
07 Nov 2026
नॅशनल कॉन्फरन्सला धक्का; आगा रुहुल्ला यांचा राजीनामा
04 Nov 2026
८७ लाख शेतकर्यांच्या खात्यात ४,३७३ कोटी दिवाळी मदत जमा
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित