E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
हार्दिक पंड्यावर पंजाब किंग्जचे लक्ष
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
अर्शदीप मुंबई इंडियन्समध्ये जाण्याची शक्यता
मुंबई
: आयपीएल 2027 च्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि पंजाब किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्या संभाव्य अदलाबदलीची चर्चा सुरू आहे. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात या मोठ्या ट्रेडबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.या व्यवहारानुसार, हार्दिक पंड्या पंजाब किंग्जकडून खेळताना दिसू शकतो, तर अर्शदीप सिंग आणि विष्णू विनोद मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होण्याची शक्यता आहे. अर्शदीपला पंजाब किंग्जने यापूर्वी मेगा लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्डचा वापर करून 18 कोटी रुपयांची बोली जुळवत पुन्हा संघात कायम ठेवले होते. दुसरीकडे, गुजरात टायटन्सकडून खेळल्यानंतर हार्दिक पंड्या 2024 च्या हंगामापूर्वी रोख रकमेच्या व्यवहारातून मुंबई इंडियन्समध्ये परतला होता. त्यानंतर त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले; मात्र त्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
Related
Articles
देवगड हापूसच्या एका पेटीला 41 हजारांचा दर
09 Nov 2026
शनिवारवाडा 38 हजार 233 पणत्यांच्या तेजाने उजळला
09 Nov 2026
मौत कितनी भी शानदार सही
10 Nov 2026
तामिळनाडूच्या चार मच्छीमारांचे मृतदेह आंध्र प्रदेशात आढळले
06 Nov 2026
’गोकुळ’वर कब्जा करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती
05 Nov 2026
बुमरा, जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर लक्ष
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)