पुणे : भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू प्रेमा रावत हिने वरिष्ठ महिला टी-20 करंडक स्पर्धेतील सामन्यात मंगळवारी येथे अवघ्या 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. या धमाकेदार खेळीसह तिने महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.उत्तराखंडच्या 24 वर्षीय प्रेमा रावत हिने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. या खेळीदरम्यान तिचा स्ट्राइक रेट तब्बल 357 इतका होता. तिच्या या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर उत्तराखंडने हैदराबादचा 89 धावांनी पराभव केला. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्या नावावर आहे. तिने याच वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. इंग्लंडची मेरी केली आणि ऑस्ट्रेलियाची लॉरा हॅरिस यांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये 15 चेंडूंमध्ये अर्धशतके झळकावली आहेत.
Fans
Followers